पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 72 वा वाढदिवस आहे. देशभरात हा सेवा दिन म्हणून साजरा केला जात आहे. भारतीय जनता पक्षाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यामध्ये रक्तदान शिबिर, कोरोना लसीकरण मोहीम, वृक्षारोपण कार्यक्रम, स्वच्छता अभियान यांचा समावेश आहे. पंतप्रधान मोदी यांचा जन्म 17 सप्टेंबर 1950 रोजी गुजरातमधील वडनगर येथे झाला. वडिलांचे नाव दामोदरदास मूलचंद मोदी आणि आईचे नाव हिराबेन आहे. पाच भावंडांमध्ये मोदी दुसऱ्या क्रमांकाचे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जीवन अतिशय रंजक आहे.
पंतप्रधान मोदींचे वडील दामोदर दास मूलचंद मोदी यांची वडनगर रेल्वे स्थानकावर चहाची टपरी होती. मोदींचे बालपणीचे नाव नरिया होते. सगळे त्यांना प्रेमाने नारिया म्हणत. वडनगर येथील भागवताचार्य नारायणाचार्य शाळेत त्यांचे शिक्षण झाले.
पंतप्रधान मोदी यांना लहानपणा पासूनच अभिनयाची आवड होती. 2013 मध्ये मोदींवर लिहिलेल्या 'द मॅन ऑफ द मोमेंट: नरेंद्र मोदी' या पुस्तकानुसार, ते 13-14 वर्षांचे असताना शाळेसाठी निधी गोळा करण्यासाठी त्यांनी शाळेतील इतर मुलांसोबत एका नाटकात भाग घेतला. ते नाटक गुजराती भाषेत होते. या नाटकाचे नाव 'पीलू फूल' असे होते. नरेंद्र मोदी शाळा सपल्यानंतर सन्यासी बनण्यासाठी घरातून पळून गेले होते, त्याच्या नंतर ते पश्चिम बंगाल मधील रामकृष्ण आश्रम मध्ये गेले,आणि तेथून देशातील अनेक ठिकाणी गेले होते. मोदी हिमालयात खुप दिवस साधू संतांच्यात राहिले होते. तेव्हा त्यांना संतांनी सांगितले की, सन्यास न घेता ही राष्ट्रसेवा करता येते. यानंतर ते परत गुजरातला आले आणि सन्यास घेण्याचा निर्णय सोडून दिला. नरेंद्र मोदी लहान पणा पासूनच RSS सोबत जोडले होते. 1958 मधील दिवाळीत गुजरात आरएसएसचे पहिले प्रांत प्रचारक लक्ष्मणराव इनामदार उर्फ वकील साहेब यांनी नरेंद्र मोदी यांना बाल स्वयंसेवकाची शपथ दिली होती. संघाच्या कार्यक्रमांमध्ये व्यवस्थापनाची जबाबदारी मोदी निभावत असत. ट्रेन आणि बसमध्ये आरएसएसच्या नेत्यांच्या आरक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर होती.पंतप्रधान मोदी हे अत्यंत वक्तशीर आहेत. ते सर्व कामे वेळेवर पूर्ण करण्याचा कायम प्रयत्न करत असत. त्यांना फक्त चार तासांची झोप मिळते. एका मुलाखतीत त्याने सांगितले होते की, शरीर निरोगी ठेवण्यासाठी ते नियमित योगासन करतात. मोदींना पतंग उडवण्याची आवड आहे, मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा ते संक्रातीला मोठ्या स्पर्धा आयोजित करत असत. मोदी RSS चे प्रचारक आणि गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यानंतर स्वतःची कामे स्वत: करत होते. ते स्वतःचे जेवन स्वतः करत होते. अहमदाबाद संघ कार्यालयात राहत असताना ते स्वतःसाठी आणि इतरांसाठी रोज चहा बनवत असत. याशिवाय मोदी स्वत: वृद्ध स्वयंसेवकांचे कपडे धुवत होते.1975 मध्ये आणीबाणी जाहीर झाली तेव्हा मोदी युवा होते. त्यावेळी स्वयंसेवक म्हणून त्यांनी आणिबाणीचा विरोध केला होता. यावेळी पोलिसांपासून वाचण्यासाठी त्यांनी सरदाराचे वेश केला. यातून अडीच वर्षे ते पोलिसांना चकमा देत राहिले.पंतप्रधान मोदींनी तरुण पणात ड्रग्जच्या विरोधात अभियान केलं होत. आजपर्यंत त्यांनी सिगारेट, दारूला हातही लावला नसल्याचे सांगितले जाते. मोदी पूर्ण शाकाहारी आहेत.नरेंद्र मोदी संघात असताना कुर्त्याच्या बाह्या लहान करून घ्यायचे. कारण यामुळे कुर्ता जास्त चांगला दिसायचा आणि घालण्यासाठी सोपा व्हायचा. आज तोच कुर्ता मोदींचा ब्रँड झाला आहे.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.