आपल्या नजरेच्या बाणाने चाहत्यांना घायाळ करणारी मल्याळम अभिनेत्री प्रिया वारियर काही सेंकदाच्या व्हिडिओमुळे ती रातोरात स्टार झाली.
अनपेक्षितपणे व्हायरल झालेल्या ‘मनिक्य मलरया पूवी’ (Manikya Malaraya Poovi) या गाण्यामुळे प्रियाला असंख्य चाहते मिळाले. उरु अदार लव्ह’ या चित्रपटातील या गाण्याने प्रियाला यशाच्या परमोच्च शिखरावर नेऊन ठेवलं. या गाण्यात हळूच भुवया उंचावतं, गालात हसून अनेकांच्या काळाजाचा ठावा घेणारी प्रिया ‘नॅशनल क्रश’ झाली. प्रिया सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असून ती नेहमी तिचे फोटो व्हिडिओ शेअर करत असते. तिच्या सर्व फोटो आणि व्हिडिओला चाहत्यांची पसंतीही मिळत असते.नुकतेच प्रियाने तिच्या इन्स्टा अकाऊंटवर ब्राईडल लूकमधील फोटो शेअर केले आहेत. प्रियाचा ब्राईडल लूक पाहून तिच्या चाहत्यांना वेड लागल्याशिवाया राहणार नाही. प्रियाने लाल रंगाचा ब्राईडल लेंहगा परिधान केला असून ती नववधू सारखी दिसत आहे. प्रियाने या लेंहग्यावर डीप नेक चोली परिधान असून तिच्या अदा चाहत्यांना घायाळ करत आहेत.प्रियाने या लेंहग्यावर जडाऊ स्टाईल हेव्ही ज्वेलरी आणि कपाळावर बिंदी वापरली असून नववधूचा लूक नेटकऱ्यांच लक्ष वेधून घेत आहे.प्रिया या ब्राईडल लूकमध्ये फारचं सुंदर दिसत आहे. प्रियाच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळत आहे. इन्टाग्रामवर प्रियाचे ७० लाख ७२ हजार फॉलोअर्स आहेत असून ती सोशल मिडिया इन्फ्यूएन्सर म्हणून काम करतेयप्रियाचे ब्राईडल लूक सध्या तुफान व्हायरल होत असून तिच्या पोस्टवर चाहत्यांनी कॉमेंट्सचा वर्षाव केला आहे.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.