Navratri 2022 special esakal
फोटोग्राफी

Navratri 2022: स्वातंत्र्यदेवींचं रूप साकारून दिली मानवंदना, नवरात्रीत शौर्यजागर

मेकअप आर्टिस्ट प्रज्ञा राऊत यांनी नवरात्रोत्सवाचे औचित्य साधत स्वातंत्र्ययुद्धातील नवदुर्गांचे मेक अप लुक्स करताना त्यांच्या शौर्याला मानवंदना दिली आहे

सकाळ डिजिटल टीम

आधुनिक भारतीय स्त्रियांना सावित्रीच्या लेकी म्हणतात ते उगीच नाही. सावित्रीबाईंनी अपार कष्टातून शिक्षित महिलांच्या पिढ्या घडविल्या. याच शिक्षित महिला आज स्वावलंबी आणि स्वाभिमानी भूमिकेतून मिळालेल्या स्वातंत्र्याप्रती कृतज्ञही आहेत. आपला देश स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत असताना अभिनेत्री दीप्ती देवी आणि मेकअप आर्टिस्ट प्रज्ञा राऊत यांनी नवरात्रोत्सवाचे औचित्य साधत स्वातंत्र्ययुद्धातील नवदुर्गांचे मेक अप लुक्स करताना त्यांच्या शौर्याला मानवंदना दिली आहे.

दीप्ती देवी यांनी अहिल्याबाई होळकर, कित्तूर राणी चेन्नमा, राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, रमाबाई रानडे, राणी लक्ष्मीबाई, अरुणा सफ अली, सरोजिनी नायडू, कॅप्टन लक्ष्मी सेहगल, राणी लक्ष्मीबाई या स्वातंत्र्यसेनानींचे लुक्स साकारले आहेत.
सुमीत रांगणेकर व अविनाश सूर्यवंशी या छायाचित्रकारांनी टिपलेल्या छायचित्रात स्वातंत्र्यसेनानींचे सौंदर्य, विद्वत्ता, धैर्य, शौर्य, औदार्य आणि निडरता या छटा चेहऱ्यावर साकारताना दीप्ती यांनी इतिहासाला जिवंत केले आहे.
सलग नऊ दिवस नऊ महिला स्वातंत्र्ययोध्यांचे लुक्स साकारतानाच त्यांच्या कार्याची माहितीही दिली आहे. सायली रेणुसे व आरती काळे यांनी वेशभूषा सजावट केली आहे.
याबाबत दीप्ती देवी म्हणाल्या, ‘‘भारतीय रणरागिणींचा इतिहास एकविसाव्या शतकातील पिढीला प्रेरणादायी ठरावा यासाठी देवीची उपासना करतानाच महिला स्वातंत्र्यसेनानींच्या कर्तृत्वाचा जागर करणे या कृतज्ञ भावनेतून ‘रिक्रिएटिंग वूमन फ्रीडम फायटर्स’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणली.’’
१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी यापलीकडे जाऊन स्वातंत्र्यसंग्रामातील आपल्या मातीतल्या स्त्रियांच्या शौर्याला चेहरा देण्याचा मी प्रयत्न केला आहे. केवळ कृष्णधवल पेंटिंग उपलब्ध असलेल्या राणी चेन्नमांसारख्या शूर स्त्रियांच्या शौर्याला अभिव्यक्त करणे हे मी कर्तव्य मानते. या स्त्रियांच्या शौर्याने मी एवढी प्रभावित आहे की, आजही मी त्यांच्या भूमिकेत स्वतःला पाहते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati By-Election : सुनेत्रा पवार सोमवारी विधानसभेसाठी दाखल करणार उमेदवारी अर्ज , इतिहासाची होणार पुनरावृत्ती

Radhanagari Tiger sighting : राधानगरीच्या जंगलात दोन वाघांची नोंद, कॅमेऱ्यात झाले कैद; सह्याद्रीत 9 वाघांची संख्या

Pune News: पुण्यात पावसाची विश्रांती; तापमानात वाढ, पुढील दोन दिवस हवामान स्थिर राहणार

Gold Silver Price Fall 2026 : सोने ५३ तर चांदी २ लाखांनी स्वस्त, ४ महिन्यात दरात मोठी घसरण; युद्धामुळे दर आणखी उतरणार?

Sankashti Chaturthi : करिअरमधील अडथळे दूर करायचेत? मग आज संकष्टी चतुर्थीनिमित्त श्रीगणेशाला अर्पण करा 'या' ५ गोष्टी; यशाचा मार्ग होईल मोकळा!

SCROLL FOR NEXT