नयनतारा(Nayanthara) आणि दिग्दर्शक विघ्नेश विजन ९ जून रोजी लग्नबंधनात अडकत आहेत. नयनतारानं तेलुगु,तामिळ,मल्याळम अशा एकूण ७५ सिनेमांत काम केलं आहे. २००३ मध्ये तिनं आपल्या करिअरला सुरुवात केली होती. दक्षिण भारतातील तीन भाषांमध्ये नयनतारानं एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे दिले आहेत.
२०१८ मध्ये फोर्ब इंडियांनं बनवलेल्या १०० सेलिब्रिटींच्या यादीत स्थान मिळवलेली दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील पहिली अभिनेत्री बनण्याचा मान नयनताराला मिळाला,जिची वर्षभराची कमाई १५.१७ करोड रुपये इतकी आहे. इमाइका नॉडिगल:-
तेलुगु भाषेतील या अॅक्शन थ्रीलर सिनेमात नयनतारानं सीबीआय अधिकारी अंजली ही दमदार व्यक्तिरेखा साकारली होती. एका सीरियल किलरचा शोध घेताना ती या सिनेमात दिसते. भरपूर अॅक्शन करताना दिसलेल्या नयनताराचं या सिनेमासाठी खूप कौतूक करण्यात आलं होतं. कोलामावू कोकिला:-
२०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या हा तामिळ सिनेमा ब्लॅक कॉमेडी क्राइम बाजाचा होता. सिनेमात नयनतारा मुख्य भूमिकेत दिसली होती. सिनेमात कोकिलाची भूमिका साकारणारी नयनतारा एका ड्रग रॅकेटमध्ये सामिल होते,ज्यामुळे तिचं कुटुंब अडचणीत पडतं. या सिनेमातील तिनं केलेला अभिनय पाहण्यासारखा आहे.अराम:-
या सिनेमात नयनतारा डिस्ट्रिक्ट कलेक्टरची भूमिका साकारताना दिसली होती. यामध्ये समाजातील सिस्टम विरोधात जाऊन अनेक कठीण प्रसंगाचा सामना करताना ती या सिनेमात दिसते. एक मुलगी बोअरवेल मध्ये पडते आणि मीडिया ही केस उचलून धरते त्या दरम्यान माधिवाधानी ही भूमिका साकारताना नयनतारानं संयम राखत कठीण प्रसंगाचा सामना करताना साकारलेली कलेक्टर मन जिंकून जाते.
नाउनुम राउडी धान:-
तामिळ भाषेतील या सिनेमात नयनतारानं एका व्यंग असलेल्या मुलीची व्यक्तिरेखा साकारलेली आहे. या सिनेमात तिनं ऐकू न येणाऱ्या बहिऱ्या मुलीची म्हणजे कादंबरीची व्यक्तिरेखा साकारली आहे. श्री राम राज्यम:-
नयनतारानं तेलुगु आणि तामिळ सिनेमात नाव मोठं केल्यानंतर २०१० मध्ये कन्नड सिने-इंडस्ट्रीत पदार्पण केलं. २०११ मध्ये नयनताराने 'श्री राम राज्यम' या सिनेमात सीतेची भूमिका साकारत त्या वर्षीचा बेस्ट तेलुगु अॅक्ट्रेस हा अॅवॉर्ड पटकावला. सिनेमातील तिच्या व्यक्तिरेखेला आणि लूकला खूप नावाजलं गेलं होतं. नाउनुम राउडी धान
तामिळ भाषेतील या सिनेमात नयनतारानं एका व्यंग असलेल्या मुलीची व्यक्तिरेखा साकारलेली आहे. या सिनेमात तिनं ऐकू न येणाऱ्या बहिऱ्या मुलीची म्हणजे कादंबरीची व्यक्तिरेखा साकारली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.