पिंपरी : महापालिकेतील भ्रष्ट्राचाराविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसने (ncp) बुधवारी ‘खाऊ गल्ली’ आंदोलन केले. ‘धरा दाम पण करा काम’ अशा घोषणा दिल्या. पाचशे व दोन हजार रुपये किंमतीच्या खेळण्यातील नोटा ‘खाऊ गल्ली’ या हातगाडीवर ठेवल्या होत्या.
पिंपरी चौकात आंदोलनाला सुरुवात झाली. महापालिकेतील विरोध पक्षनेते राजू मिसाळ, नगरसेवक नाना काटे, मयूर कलाटे, नगरसेविका पौर्णिमा सोनवणे, वैशाली घोडेकर, माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.महापालिकेत भाजपची सत्ता आहे. स्थायी समितीचे अध्यक्षपद त्यांच्याकडे आहे. एका ठेकेदाराकडून वर्कऑर्डर काढण्यासाठी एक लाख १८ हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे व चार कर्मचाऱ्यांना अटक झाली होती. बुधवार, १८ ऑगस्ट रोजी ही कारवाई झाली होती. या ठेकेदाराला दहा लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. भाजपच्या लाच प्रकरणाचा निषेध व महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. पिंपरी चौकात हातगाडीवर पैशांचे दुकाने लावले होते. भाजप विरोधी घोषणा देत मोर्चा काढण्यात आला. मोरवाडी चौकातून वळसा घेऊन मोरचा महापालिकेच्या प्रवेशद्वारावर होपोचला. तिथेही आंदोलन करण्यात आले. महापालिकेची साप्ताहिक बैठक बुधवारी असते. आजही दुपारी अडीच वाजता बैठक आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने आंदोलन केले.
दरम्यान, पिंपरी चौकातून आंदोलक महापालिकेकडे निघाले होते. पुणे-मुंबई महामार्गाच्या सेवा रस्त्याने मोरवाडी चौक मार्गे मोर्चा महापालिकेत होपोचला. त्यामुळे सेवा रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. महापालिकेची आगामी निवडणूक सहा महिन्यावर आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आजचे आंदोलन आहेब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.