तुम्ही काही लोकांना पाहिलं असेल, की प्रतिभा असूनही त्यांच्यात 'आत्मविश्वास' नसतो. याची अनेक कारणं असू शकतात, परंतु बालपणातील काही गोष्टी देखील यासाठी जबाबदार आहेत.
तुम्ही काही लोकांना पाहिलं असेल, की प्रतिभा असूनही त्यांच्यात 'आत्मविश्वास' नसतो. याची अनेक कारणं असू शकतात, परंतु बालपणातील काही गोष्टी देखील यासाठी जबाबदार आहेत. अशा स्थितीत प्रत्येक पालकानं काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी.कोणतीही गोष्ट छोटी अथवा मोठी असली, तरी ती आपले वय व वृत्तीवर अवलंबून असते. उदाहरणार्थ, बेडवरून उडी मारणं, फुटबॉलला लाथ मारणं ही आपल्यासाठी छोटी गोष्ट असू शकते, परंतु लहान मुलांसाठी हीच गोष्ट खूप महत्त्वाचे वाटते. त्यामुळं आपण लहान मुलांच्या छोट्या-छोट्या गोष्टींची कधीही खिल्ली उडवू नका.प्रत्येक मूल हे प्रियचं असतं. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या सवयी असतात; पण एक सवय लहानपणी सामान्य असते. ती म्हणजे, मुलं जेव्हा इतर मुलांना चांगलं सांगतात, तेव्हा ती मनापासून बोलत असतात. अशा स्थितीत अशी शक्यता असते, की मुलं इतर मुलांशी चिडचिड करू लागतील अथवा ते स्वतःला कमी समजतील, म्हणून मुलांची तुलना इतरांशी करणं टाळा.बालपणात कोणतंही काम उत्तम प्रकारे करण्यापेक्षा, मुलांसाठी काही ना काही चांगलं करत राहणं महत्त्वाचं असतं. असं केल्यानं, मुलांची वाटचाल योग्य दिशेनं सुरु राहते. उदाहरणार्थ, जर तुमचं मूल चित्रकलेत पारंगत असेल, तर त्याच्या चित्रातील 'दोष' शोधण्याऐवजी त्याच्या चित्रातील चांगल्या गोष्टींची स्तुती करा.बरेच पालक आपल्या मुलांबद्दल इतर लोकांकडे किंवा आजूबाजूला तक्रार करत असतात. कधी-कधी पालक हे विनोद म्हणून, अथवा फक्त गप्पा मारण्याच्या हेतूनं करतात, परंतु या गोष्टी मुलांच्या मनात घर करुन राहतात आणि त्यांचा आत्मविश्वास कमी करतात.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.