रिकाम्या पोटाचा (Empty Stomach)आपल्यावर अनेक प्रकारे परिणाम होतो. हे आरोग्यासाठी तर हानिकारक (Harmful) आहेच, पण त्याचबरोबर ते तुमच्या प्रकृतीसाठीही घातक ठरू शकते. अशा परिस्थितीत, आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्या रिकाम्या पोटी करायला विसरू नका.
रिकाम्या पोटी झोपू नका (Do not sleep on an empty stomach):
खाणे आणि झोपणे यामध्ये 2-3 तासांचे अंतर असावे असा सल्ला दिला जातो. परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्हाला उपाशी झोपावे लागेल. जर तुम्हाला जेवायला आवडत नसेल तर तुम्ही झोपण्यापूर्वी एक ग्लास दूध (Milk)पिऊ शकता.रिकाम्या पोटी वाद घालू नका (Dont argue):
हे विचित्र वाटेल, परंतु जर तुमच्यासोबत असे काही घडले असेल तर तुम्ही रिलेट करू शकता. अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की, जेव्हा लोकांना राग येतो तेव्हा ते सहसा कमी रक्तातील साखरेचा सामना करत असतात. अशा परिस्थितीत, मूड बदलू शकतो आणि चिडचिड होऊ शकते, आपण समोरच्या व्यक्तीला काहीतरी चुकीचे सांगू शकता.
खरेदी करणे:
रिकाम्या पोटी खरेदी केल्याने गरजेपेक्षा अधिक जंकफूड (Junk food)खाल्ले जाते. जर तुम्हीही रिकाम्या पोटी राहण्याची सवय सोडली कर अनेक प्रकारचे आजार तसेच लठ्ठपणाच्या समस्या सतावू शकतात.
रिकाम्या पोटी च्युइंगम (Chewing gum)चघळणे:
रिकाम्या पोटी च्युइंगम (Chewing gum)चघळणे देखील खूप हानिकारक असू शकते. यामागील कारण म्हणजे ते चघळल्याने पचनक्रिया (Digestion) उत्तेजित होते, ज्यामुळे पाचक अॅसिडचे उत्पादन सुरू होते. जेव्हा अन्न पचनाची प्रक्रिया (The process of digestion of food) व्यवस्थित असते. तेव्हा या अॅसिडचा वापर केला जातो. परंतु जेव्हा तुम्ही रिकाम्या पोटी असता तेव्हा अॅसिड पोटाच्या आतील अस्तरांना नुकसान करते. ज्यामुळे अल्सर आणि इतर गंभीर परिस्थिती उद्भवू शकतात.
दारु (Alcohol):
जेव्हा तुम्ही रिकाम्या पोटी अल्कोहोल (Alcohol)प्याल तेव्हा ते थेट रक्तप्रवाहात जाते आणि यामुळे आपल्या शरीरातील रक्तवाहिन्या (Blood vessels) पसरतात, ज्यामुळे उष्णता सुरू होते. जरी यामुळे बीपी (BP) किंवा टेंम्पररी पल्स (Temporary pulse)
सारख्या समस्या उद्भवू शकतात.
चहा-कॉफी (Tea-coffee):
बऱ्याच लोकांची सकाळ चहाच्या कपाने होते. त्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. मात्र सकाळचा हाच चहा तुम्हाला महागात पडू शकतो. रिकाम्या पोटी चहा अथवा कॉफीचे (Tea-coffee) सेवन केल्यास अॅसिडिटीची (Acidity)समस्या निर्माण होऊ शकते. पुढे जाऊन याचा अधिक त्रास होऊ शकतो. Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.