न्यूयॉर्क : (फोटो : रॉयटर्स)
आपल्या आप्तस्वकियांना अमेरिकन नागरिकांनी केलं अभिवादन
डावीकडून माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन-हिलरी क्लिंटन, बराका ओबामा-मिशेल ओबामा, जो बायडन-जिल बायडन, न्यूयॉर्क शहराचे माजी महापौर मिशेल ब्लूमबर्ग त्यांच्या सहकारी डायना टेलर, स्पिकर ऑफ द हाऊस नॅन्सी पेलॉसी आणि सिनेटचे सदस्य यांनी 9/11 स्मारकाला भेट देत वीस वर्षांपूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील आपल्यान मृत नागरिकांना अभिवादन केलं. (फोटो : रॉयटर्स) न्यूयॉर्क : ११ सप्टेंबर २००१ रोजी झालेल्या अमेरिकेवरील भीषण दहशतवादी हल्ल्यात २,९७७ अमेरिकन लोकांचा मृत्यू झाला होता. ट्वीन टॉवर्स या न्यूयॉर्कमधील जुळ्या गगनचुंबी इमारतींवर विमान धडकवत दहशतवाद्यांनी त्या उद्ध्वस्त केल्या होत्या. दरम्यान, राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी आपल्या नागरिकांना अभिवादन करण्यासाठी सर्वांना एकत्र येण्याचं आवाहन केलं होतं. (फोटो : रॉयटर्स) न्यूयॉर्क : कुटुंबीय आपल्या आप्तस्वकियांना अभिवादन करण्यासाठी 9/11 समारंभात सहभागी झाले होते. (फोटो : रॉयटर्स)न्यूयॉर्क : शहरातील मॅनहॅटन इथल्या स्मारकावर पुष्प अर्पण करुन अनेकानी या दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्यांना अभिवादन केलं. (फोटो : रॉयटर्स)न्यूयॉर्क : स्मारकाजवळ आपल्या कोणा नातेवाईकाच्या आठवणीत ही महिला भावूक झाली. (फोटो : रॉयटर्स)न्यूयॉर्क : शहरातली टाईम स्केअर या प्रसिद्ध इमारतीवर 9/11 हल्ल्यात मृत्यू झालेल्या नागरिकांची नावं झळकली होती. (फोटो : रॉयटर्स)न्यूयॉर्क : 9/11 स्मारकावर मृत नागरिकांची नाव कोरली आहेत. आपल्या जवळच्या व्यक्तीचं नाव असलेल्या ठिकाणी पुष्प अर्पण करुन नागरिकांनी अभिवादन केलं. (फोटो : रॉयटर्स)न्यूयॉर्क : या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू पावलेल्या नागरिकांची आठवणींच्या उद्देशानं अनेक अमेरिकेचे राष्ट्रध्वज लावण्यात आले होते. या ठिकाणाहून पायी निघालेल्या नागरिकालाही आठवणी दाटून आल्या असतील. (फोटो : रॉयटर्स)न्यूयॉर्क : दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर न्यूयॉर्क शहराला सलाम करण्यासाठी एका बोटमधून पाण्याचे असे रंगीत फवारे उडवण्यात आले. (फोटो : रॉयटर्स)न्यूयॉर्क : 9/11 स्मारकामध्ये तयार केलेल्या म्यूरल्सच्या पार्श्वभूमीवर एक अमेरिकन नागरिक पायी चालेलला आहे. या म्यूरल्समधून एकतेचा संदेश देण्यात आला असून ही घटना कधीही विसरता येणार नाही, असंही इथल्या भिंतीवर म्हटलं आहे. (फोटो : रॉयटर्स)ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.