New Zealand sakal
फोटोग्राफी

New Zealand : 'काळी चिमणी मिळायला पाहिजे लेका!' न्यूझीलंडचं 7 वर्षात 5 वेळा असं झालंय

T20 विश्वचषक 2022 च्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा पाकिस्तानकडून पराभव झाला. किवी संघाला बाद फेरीत हरण्याची आता सवय....

Kiran Mahanavar

New Zealand T20 World Cup : शेवटी ज्याची भीती वाटत होती तेच झाले. 2022 च्या टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा संघ पुन्हा एकदा चोकर्स ठरला. पाकिस्तानविरुद्ध त्यांना 7 विकेट्सनी पराभव पत्करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड संघाने 152 धावा केल्या आणि पाकिस्तान संघाने 5 चेंडू आधीच लक्ष्य गाठले. या पराभवाने पुन्हा एकदा किवी संघाचे चॅम्पियन होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले.

2015 च्या विश्वचषकापासून न्यूझीलंडचा संघ 5 वेळा चॅम्पियन बनू शकला नाही. एकदिवसीय किंवा टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रत्येक वेळी त्याला पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
न्यूझीलंडचा संघ 2015 मध्ये एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाला होता. ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडवर 7 विकेट्सने मात केली.
2016 टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा पुन्हा 7 विकेट्सने पराभव झाला. यावेळी इंग्लंडने चॅम्पियन बनण्याचे त्याचे स्वप्न भंगले होते.
एकदिवसीय विश्वचषक 2019 च्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत त्यांचा इंग्लंडकडून पराभव झाला. अंतिम सामना सुपर ओव्हरमध्ये गेला आणि तोही बरोबरीत सुटला. यानंतर इंग्लंडला विजेता घोषित करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vasant More Video: शिवतीर्थ, मातोश्री लांब राहिलं आधी..,दुबेंना मोरेंनी खडसावलं..

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

Latest Maharashtra News Updates : पारोळा तालुक्यात पावसाअभावी लघु प्रकल्पांचा घसा कोरडाच

Heavy Rain Alert: विदर्भासाठी अलर्ट! जोरदार पावसाचा इशारा; राज्यातल्या 'या' भागात मुसळधार बरसणार

Manish Kashyap : भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रसिद्ध युट्यूबर मनीष कश्यपने सुरू केली नवी राजकीय इनिंग!

SCROLL FOR NEXT