railway stations
railway stations  google
फोटोग्राफी

पुढचं स्टेशन पनौती! भारतातील रेल्वे स्थानकांची हटके नावं

सकाळ डिजिटल टीम

आधुनिक काळात रेल्वे प्रवास (Railway Travel) आरामदायी तसेच सुरक्षितही झाला आहे. तंत्रज्ञान आणि स्टेशन टू स्टेशन देत असलेल्या घोषणांमुळे प्रवासाची (Tour) एक वेगळी मजा येत असते. पण तुम्ही एका नवीन मार्गावरून प्रवास करत आहात. तेवढ्यात तुम्हाला ऐकू येते...'पुढील स्टेशन, सिंगापूर...आगला स्टेशन, सिंगापूर'. एकदम तुम्ही गोंधळून जाल! नक्की कुठे आलो असे तुम्हाला होईल. पण, तुम्ही भारतात आहात आणि तेही ओडिशात. तुम्हाला भारतातील अशा अनेक रेल्वे स्थानकांवरून प्रवास करायला आवडेल का? ही अशी नावे आहेत ज्यामुळे तुम्हाला हसायला येईल.

पनौती रेल्वे स्थानक Panauti Railway Station)- इंग्रजीत पनौती म्हणजे ‘दुर्भाग्य. उत्तर प्रदेशातील चित्रकूट जिल्ह्यात वसलेल्या या गावात राहणारे लोक या टॅगपासून कधीच सुटू शकत नाहीत. त्यामुळे प्रत्येक वेळी जेव्हा एखादी ट्रेन या स्थानकावरून जाते तेव्हा अनेक प्रवासी विचार करत असावेत: “पनौती पीछे छुट गई”
काला बकरा(Kala Bakra)- तुम्ही रेल्वे तिकीट बुकिंग विंडोवर आहात आणि मला काला बकरा स्टेशनची दोन तिकिटे द्या, असे म्हणता. तुमच्या मागे रांगेत उभ्या असलेल्या, या मार्गाविषयी काहीही माहिती नसलेल्या माणसाला तुम्ही कदाचित मजा करताय असे वाटू शकेल. पण हे स्टेशन आहे. KKL च्या स्टेशन कोडसह, स्टेशन काला बाकरा हा गावाचा एक भाग आहे. उत्तर रेल्वे अंतर्गत हे स्थानक असून ते जालंधर-पठाणकोट मार्गावरील पंजाबच्या जालंधर जिल्ह्याच्या भोगपूर विकास ब्लॉक अंतर्गत येते.
सूअर रेल्वे स्थानक (Suar Railway Station)- या स्थानकाचा 'सूअर के बच्चो" या जुन्या हिंदी चित्रपटातील संवादाशी काहीही संबंध नाही. याचा अर्थ असा नाही की स्टेशन हे डुकरांचे घर आहे (उलट, उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातील सुआर शहराच्या स्थानामुळे या स्थानकाचे नाव पडले. रामपूर, मुरादाबाद आणि अमरोहा ही जवळची मोठी स्थानके आहेत.
भैसना जंक्शन (Bhainsa Junction) - सिंगल इलेक्ट्रिक लाइनसह, हे स्टेशन उत्तर मध्य रेल्वेच्या अंतर्गत येते. या स्थानकाला सुमारे ५०,००० लोकसंख्येच्या तेलंगणातील निर्मल जिल्ह्यातील एका शहराचे नाव दिलेले आहे. येथून फक्त सहा प्रवासी गाड्या भैंसा (म्हणजे बैल) जंक्शन ओलांडतात. मुदखेड, एच साहिब नांदेड आणि पूर्णा जंक्शन ही त्याच्या जवळची प्रमुख रेल्वे स्थानके आहेत.
कुत्ता रेल्वे स्थानक (Kutta Railway Station) - नैसर्गिक सौंदर्य आणि वन्यजीवांनी नटलेले कुट्टा (म्हणजे कुत्रा) हे कर्नाटकातील गोनीकोप्पलजवळचे एक छोटेसे गाव आहे. म्हैसूरपासून जवळपास 100 किमी अंतरावर हे गाव कुर्गच्या टोकावर आहे आणि सर्वात जवळचे मोठे स्टेशन म्हैसूर आहे. पण या स्थानकाला कुत्ता का म्हणतात हे अद्याप उमगलेले नाही.
बिबी नगर रेल्वे स्थानक (Bibi Nagar Railway Station) - बायको शोधण्यासाठी हे स्थानक नाही. तर, हे हैदराबादमध्ये असलेले स्थानक आहे.. बीबी नगर हे तेलंगणाच्या राजधानीतील मुशी नदीच्या काठावर वसलेले एक छोटेसे शहर आहे. जवळचे मोठे स्टेशन हैदराबाद जंक्शन आहे.
साली रेल्वे स्थानक (Sali Railway Station)- हैद्राबादला जर बीबी असेल तर तुमची साली राजस्थानात आहे. असे तुम्ही मजेने म्हणू शकता. साली रेल्वे स्टेशन उत्तर पश्चिम रेल्वे अंतर्गत येते ज्याचा स्टेशन कोड SALI आहे. या स्थानकावरून जयपूर आदी सेंजर आणि जयपूर पॅसेंजर या दोन गाड्या जातात.
सिंगापूर रोड जंक्शन रेल्वे स्थानक (Singapur Road Junction Railway Station) - ओडिशातील रायगडाजवळ हे स्थानक आहे. येथून कोरापुट-रायगडा रेल्वे मार्ग विजयनगरम-रायपूर मुख्य मार्गाला मिळतो. 248 मीटर उंचीवर असलेले, सिंगापूर रोड जंक्शन रेल्वे स्थानक ईस्ट कोस्ट रेल्वेच्या वॉल्टेअर रेल्वे विभागाच्या अखत्यारीत येते. SPRD च्या स्टेशन कोडसह, कोरबा-विशाखापट्टणम एक्सप्रेस, टाटानगर-अलाप्पुझा स्लिप एक्सप्रेस, हिराखंड एक्सप्रेस, तिरुपती-बिलासपूर एक्सप्रेस, समता एक्सप्रेस, पुरी-रायगडा एक्सप्रेस, कोरापुट (समलेश्वरी) एक्सप्रेस आदी ट्रेन या स्थानकावरून जातात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT