Novak Djokovic and Daniil Medvedev
जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेला नोवाक जोकोविच कँलेंडर ग्रँडस्लॅमपासून आता केवळ एक पाउल दूर आहे. वर्षातील अखेरची ग्रँडस्लॅम स्पर्धा असलेल्या अमेरिकन ओपन स्पर्धेतील सेमी फायनलमध्ये त्याने जर्मनीच्या अॅलेक्झांडर झ्वेरेव्हला पराभूत केले. फायनलमध्ये आता जोकोविचसमोर रशियन डॅनियल मेदवेदेव याचे आव्हान असणार आहे. सर्बियाचा नोवाक जोकोविच आणि रशियन डेनियल मेदवेदेव यांच्यात ऑस्ट्रेलियन ओपनची फायनल झाली होती. यात जोकोविचनं बाजी मारली होती. टेनिसच्या मैदानात यंदाचे वर्ष जोकोविचसाठी खासच आहे. ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन आणि विम्बल्डन ओपन या तिन्ही ग्रँडस्लॅम स्पर्धा त्याने जिंकल्या आहेत. अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकून कॅलेंडर ग्रँडस्लॅम पूर्ण करण्याची त्याच्याकडे संधी आहे. एकाच वर्षात चार ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांनाही जमलेला नाही.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.