Om Puri Birth Anniversary esakal
फोटोग्राफी

Om Puri : ओम पुरी ‘ह्या’ चित्रपटाच्या माध्यमातून सदैव आपल्या आठवणीत राहतील...

सकाळ डिजिटल टीम

दमदार आवाज आणि उत्कृष्ट अभिनय अशी ओळख असणारे बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी आता आपल्यात नाहीत. पण त्यांनी आपल्या प्रतिभेच्या आणि चित्रपटांच्या स्वरुपात जो अमूल्य वारसा मागे ठेवला आहे त्याच्या माध्यमातून ते आपल्या आठवणींत आहेत. त्यांनी अनेक हिंदी तसेच ब्रिटिश, अमेरिकन, पाकिस्तानी चित्रपटांमध्ये काम केले. पुरी यांचा अंधेरी  मुंबई येथे राहत्या घरी वयाच्या ६६व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्याचे काही गाजलेले चित्रपट...

'अर्ध सत्य': गोविंद निहलानी यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात ओम पुरी हे पोलीस उपनिरीक्षकाची भूमिका निभावली होती. जे त्यांच्या सभोवतालच्या वाईट गोष्टींशी लढतात. या चित्रपटातील ओम पुरी यांच्या अभिनयाचे तर कौतुक आणि त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता.
'आक्रोश': या चित्रपटाची कथा एका सत्य घटनेवर आधारित होती. या चित्रपटात गरीब आणि असहाय लोकांचा श्रीमंतांकडून कसा छळ केला जातो हे दाखविण्यात आले हाते तसेच न्यायव्यवस्थेतील भ्रष्टाचारावरही प्रकाश टाकण्यात आला होता.या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, तर ओम पुरी यांना त्यांच्या भूमिकेसाठी फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
‘आरोहण': श्याम बेनेगल यांचा 1982 सालचा हिंदी चित्रपट आहे, ज्यात व्हिक्टर बॅनर्जी आणि ओम पुरी यांनी मुख्य भूमिका साकारल्या असून दीप्ती भट्ट हरीच्या पत्नीच्या भूमिकेत आहेत. हा देखील एक असा चित्रपट आहे ज्यात ओम पुरी यांनी आपल्या अभिनयाचे उदाहरण सादर केले होते. या चित्रपटात ओम पुरी यांनी हरी मंडल या शेतकऱ्याची भूमिका निभावली ज्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला होता.
'माचीस': गुलजार यांच्या चित्रपटात तब्बू, ओम पुरी, जिमी शेरगिल आणि चंद्रचूर सिंग यांच्या प्रमुख भूमिका होत्या. चित्रपटाची पार्श्वभूमी 1980 च्या दशकात पंजाबमध्ये झालेल्या शीख बंडाशी मिळती जुळती होती. बदला घेण्यासाठी एक सामान्य तरुण कसा भयंकर दहशतवादी बनतो हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. या चित्रपटाने बक्कळ कमाई होती.
'डर्टी पॉलिटिक्स': ओम पुरींच्या दमदार अभिनयाचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे हा चित्रपट .या चित्रपटात त्यांनी एका घोटाळ्यात अडकलेल्या नेत्याची भूमिका साकारली होती. चित्रपटात ओम पुरी आणि मल्लिका शेरावत यांच्यात अनेक बोल्ड सीन्स होते आणि त्यामुळे चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

Blood Donation Recovery: रक्तदान केल्यानंतर शरीरात कोणते बदल होतात? शरीर कसं रिकव्हर होतं? ‘या’ 3 गोष्टी ठेवा लक्षात

Illegal Sand Mafia Attack: अंबडमध्ये अवैध वाळू उपशावर कारवाईला गेलेल्या तहसीलदारांसह महसूल पथकाला वाळू माफियांची मारहाण; हायवा ट्रक धडक देत पळवले

SCROLL FOR NEXT