Osho Birth Anniversary esakal
फोटोग्राफी

Osho Birth Anniversary 2022 : ओशोंच्या जीवनातल्या 'या' ६ महत्वपूर्ण गोष्टी माहितीयेत?

ओशोंचं जीवन जेवढं रहस्यमय होतं तेवढाच त्यांचा मृत्यूपण गुढ होता. त्यांच्या इंटरेस्टिंग जीवनाविषयीच्या ६ खास गोष्टी जाणून घेऊया.

सकाळ डिजिटल टीम

ओशोंचा जन्म

त्यांचा जन्म ११ डिसेंबर १९३१ मध्ये कुचवाडामध्ये झाला होता. जन्माच्या वेळी त्यांचं नाव चंद्रमोहन जैन होतं. लहानपणापासूनच त्यांना अध्यात्माची आवड होती. त्यांनी जबलपूरमध्ये शिक्षण पुर्ण केल्यावर तिथेच प्राध्यापक म्हणून नोकरी करू लागले.

त्यांनी वेगवेगळ्या धर्म आणि विचारधारांवर प्रवचन देण्यास सुरूवात केली. त्यासोबतच ध्यान शिबीर सुरू केले. सुरूवातीला लोक त्यांना आचार्य रजनीश म्हणून ओळखत.

नोकरी सोडल्यावर त्यांना नवसंन्यास आंदोलनाची सुरूवात केली. त्यानंतर ते स्वतःला ओशो सांगू लागले.

अमेरिकेचा प्रवास ते १९८१-८५ दरम्यान अमेरिकेत गेले. तिथल्या ऑरेगॉनमध्ये त्यांनी आश्रमाची स्थापा केली. हा आश्रम ६५ हजार एकरात पसरलेला आहे. त्यांचा हा प्रवास फारच विवादास्पद राहिला. महागड्या गाड्या, रोल्स रॉयल्स कार, डिझायनर कपडे यामुळे ते कायम चर्चेत राहिले. ऑरेगॉन मधल्या ओशो आश्रमाला त्यांचे शिष्य रजनीशपुरम म्हणून रजिस्टर करू पाहत होते. पण स्थानिक लोकांनी ते होऊ दिलं नाही. त्यानंतर १९८५ मध्ये ते भारतात परतले.
ओशोंचा मृत्यू अमेरिकेतून पुण्यातल्या कोरेगाव पार्कमधल्या आश्रमात परतले. १९ जानेवारी १९९० मध्ये त्यांचा मृत्यू झाला. नंतर सर्व कारभार शिष्यांनी त्यांच्या हातात घेतला. आश्रमाची संपत्ती कोट्यावधींची आहे असं मानलं जातं. त्यावरून शिष्यांमध्ये वाद पण निर्माण झाले आहेत. ओशोंचं साहित्य, त्यांच्या मृत्यूचं कारण या सगळ्याच गोष्टी रहस्यमय असून त्याविषयी अनेक वादविवाद आहेत.
मृत्यूच्या दिवशी काय झालं? अभय वैद्य यांच्या हू किल्ड ओशो या पुस्तकात त्यांनी लिहिलं आहे की, १९ जानेवारी १९९० ला डॉ गोकुळ गोकाणी यांना फोन गेला. त्यांना लेटर हेड आणि इमर्जंसी किट घेऊन यायला सांगितलं. गोकाणी यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात लिहिलं आहे की, ते साधारण २ वाजता पोहचले. ओशो देहत्याग करत आहेत त्यांना वाचवा असं सांगण्यात आलं पण ओशोंपर्यंत पोहचू दिलं नाही. काही तासांनी त्यांना मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं आलं आणि मृत्यूपत्र बनवायला लावलं. त्यावर हृदय विकाराचा झटका आल्याचं कारण लिहिण्याचा दबाव टाकण्यात आल्याचं गोकाणी यांनी म्हटलं आहे.
ओशोंचं मृत्यूपत्र योगेश ठक्कर यांचं म्हणनं आहे की, ओशो आश्रमाची संपत्ती साधारण हजारो कोटी रुपयांची आहे. आणि पुस्तक विक्रीतून मिळणारी रॉयल्टी शंभर कोटींची आहे. ओशोंच्या वारशावर ओशो इंटरनॅशनलचा ताबा आहे. त्यांचा दावा आहे की, त्यांच्याकडे ओशोंचं मृत्यूपत्र आहे. पण ठक्कर यांचं म्हणनं आहे की, ते मृत्यूपत्र खोटं आहे. पण ओशोंची शिष्या अमृत साधना या आरोपांचं खंडन करते.
ओशोंवर ट्रेडमार्क ओशो इंटरनॅशनलने ओशोंच्या नावाचा ट्रेडमार्क घेतलेला आहे. याला दुसरी संस्थ ओशो लोटस कम्यून ने आव्हान दिलं होतं. काही वर्षांपूर्वी ओशो इंटरनॅशनलच्या बाजूने निकाल लागला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पाण्यात अडकलेल्या तरुणाची रेस्क्यू टीमने केली सुटका

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT