नागपूर : सर्वसाधारणपणे ओव्याचा वापर स्वयंपाकामध्ये एखाद्या पदार्थाचा स्वाद वाढवण्यासाठी केला जातो. मात्र, याव्यतिरिक्त पण ओवा खाण्याचे अनेक फायदे आहेत. पचनाच्या विकारांप्रमाणेच अन्य काही आजारांवरदेखील ओवा उपयुक्त आहे. पोटाशी संबंधित अनेक विकारांमध्ये ओवा गुणकारी असल्याने त्याचे सेवन केल्यास पोटदुखी, गॅसेस, उलट्या होणे, आम्लपित्त या विकारांमध्ये आराम मिळतो.
पोटाशी संबंधित विकारांवर ओव्याचे सेवन करण्यासाठी ओवा, काळे मीठ आणि सुंठ एकत्र करून पावडर करावी. हे चूर्ण घेतल्याने पित्त आणि उलट्यांच्या त्रास कमी होतो.अपचन झाले असेल तर ओवा तव्यावर भाजून खा. यामुळे अपचनाचा त्रास कमी होईल.रात्री थोडा ओवा पाण्यात भिजवून हे पाणी सकाळी प्या. यामुळे चयापचय क्रिया सुधारते आणि वजन कमी व्हायला मदत होते.सतत खोकला येत असेल तर पाण्यामध्ये ओवा घालून हे पाणी उकळून घ्या. पाणी थंड झाल्यावर त्यात थोडे काळे मीठ घालून सेवन करा.सतत गुडघे दुखत असतील तर ओवा गरम करून रुमालात बांधून गुडघ्यांना शेक घ्या.अर्धाकप ओव्याच्या पाण्यामध्ये सुंठ घालून सेवन केल्यास सांधेदुखीचा त्रास कमी होतो.ओव्याची पूड करून ती दहीमध्ये मिसळावी. हा लेप चेहऱ्यावर लावल्यास मुरूम येणे बंद होईल.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.