मुलांचे (Children)मन हे मातीसारखे असते. लहानपणी तुम्ही त्यांना जे काही शिकवाल ते ते शिकत जातात. अशा स्थितीत पालक (Parents) म्हणून मुलांना लहानपणीच अशा काही गोष्टी शिकवणे ही तुमची जबाबदारी आहे, ज्यातून ते केवळ चांगले माणूस बनू शकत नाहीत तर समाजालाही एक दर्जा प्राप्त होऊ शकतो.
मोठ्या व्यक्तींना नमस्कार करण्यास शिकवा:
मुलांना घरी आल्यावर हॅलो (Hello)किंवा हाय (Hey) बोलून नमस्कार करायला शिकवा. अनेक मुलं घरी आल्यावर किंवा कुणाला भेटताच लपून बसतात. अशा परिस्थितीत त्यांना लहानपणापासूनच एकत्र मिसळणे जमत नाही.
समोर पाहून बोलायला शिकवा:
मुलांना शिकवा की आय कॉन्टॅक्ट (Eye Contact) करुन बोलायला आले पाहिजे. त्यामुळे मुलांचा आत्मविश्वास (Confidence) वाढतो. मुलांना हे शिकवा की त्यांनी लाजून बोलायचे नाही, तर बोलता बोलता त्या व्यक्तीच्या चेहऱ्याकडे बघून बोलावे.हॅन्ड शेक (Handshake) करायला शिकवा: मुलांना समजावून सांगा की हॅन्ड शेक (Handshake) करताना समोरच्या व्यक्तीचा हात पकडावा. त्यांना सांगा की हॅन्डशेक करणे हे प्रोफेशनल ग्रीट (Professional Greet) आहे. मुलगा असो वा मुलगी, तो औपचारिक (Formal)मानला पाहिजे.समोरच्या व्यक्तीचे पूर्ण बोलणं ऐका:
मुलांना सांगा की चांगले बोलायचे असेल तर त्यांनी पहिल्यांदा समोरच्या व्यक्तीचे पूर्ण ऐकले पाहिजे. एखाद्याचा मुद्दा सुरु असताना मध्येच स्वतःबद्दल बोलणे ही चांगली सवय नाहीयेय.
थॅंक्यू (Thank You)म्हणायला शिकवा:
जेव्हा एखादी गोष्ट सापडते किंवा समोरच्या व्यक्तीकडून मदत मिळते तेव्हा मुलांना नेहमी धन्यवाद (Thank You) म्हणायला शिकवा. जर कोणी तुमच्यासाठी काही करत असेल तर तुम्हाला त्यांचे मनापासून आभार मानावे लागतील, याची जाणीव त्यांना करून द्या.
प्लीज (Please) म्हणण्यात काही गैर नाही:
कृपया (Please) एखाद्याला विनंती (Request) करणे असे फार महत्वाचे आहे. लहान किंवा मोठ्यांना रिक्वेस्ट करताना त्यांनी कृपया (Please) म्हणावे असे मुलांना सांगा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.