M. S. Dhoni
M. S. Dhoni 
फोटोग्राफी

Photos: धोनीने चाहत्यांना दिले 'हे' पाच धक्के

सकाळ डिजिटल टीम

क्रिकेटमधील लोकप्रिय खेळाडू महेंद्रसिंग धोनी याचे भारतासह जगभरात मोठ्या संख्येने चाहते आहे. धोनीने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ३०० हून अधिक सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आणि विशेष म्हणजे त्याच्या विजयाची टक्केवारी ५० टक्क्यांहून अधिक होती. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने टी २० विश्वचषक (२००७), एकदिवसीय विश्वचषक (२०११) आणि चॅम्पियन्स ट्रॉफी (२०१३) जिंकली. आयपीएल लिगच्या पहिल्या हंगामापासूनच चेन्नईचे कर्णधारपद धोनीकडे होते. मात्र आयपीलचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच धोनीने अचानक गुरवारी चेन्नईची कॅप्टन्सी सोडली. त्यामुळे धोनीच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. महेंद्रसिंग धोनीने अनेकदा चाहत्यांना धक्के दिले. यातील काही प्रामुख्याने-

१. २०१४ मध्ये असाच एक धक्का धोनीने चाहत्यांना दिला होता. भारतीय संघ २०१४ मध्ये ऑस्ट्रेलियन दौऱ्यावर गेला होता. त्यानंतर अॅडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत धोनी दुखापतीमुळे खेळला नाही. दुसऱ्या कसोटीत त्याने पुनरागमन करून संघाचे नेतृत्व केले. दुसऱ्या कसोटीनंतर धोनीने अचानक कसोटीतून निवृत्ती जाहीर केली. त्या निर्णयाने भारतीय क्रिकेटचे सर्व चाहते थक्क झाले होते.
२. २०१७ मध्येही असेच काहीसे घडले होते. २०१७ मध्ये धोनीने अचानक वनडे आणि टी-20 संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा करत विराट कोहलीकडे सोपविले होते.
३. २०१९ च्या विश्वचषकापर्यंत तो वनडे क्रिकेट खेळला. यानंतर वर्षभर धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता. या दरम्यान त्याचे चाहते त्याला पाहायला उत्सुक होते. मात्र धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून लांब राहला.
४. अखेर १५ ऑगस्ट २०२० रोजी, संध्याकाळी ७ वाजता धोनीने अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. हा चाहत्यांसाठी खूप मोठा धक्का होता.
५. आयपीलच्या गेल्या १४ हंगामात धोनीने २०४ सामन्यांमध्ये CSK चे नेतृत्व केले. यापैकी चेन्नईने १२१ सामने जिंकले तर ८२ सामने गमावले. धोनीच्या नेतृत्वाखाली, चेन्नई सुपर किंग्जने चार वेळा आयपीएल ट्रॉफी (२०१०, २०११, २०१८ आणि २०२१) चे विजेतेपद जिंकले. मात्र गुरुवारला धोनीने आयपीलचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच चेन्नईची कॅप्टन्सी सोडली. तर आता चेन्नईचा नवा कर्णधार रविंद्र जडेजाला केले. धोनीची ही शेवटची आयपीएल असू शकते, असे मानले जात आहे. त्यानंतर ते निवृत्त होईल अशीही शक्यता वर्तवली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT