Taj mahal 
फोटोग्राफी

Photos : सातासमुद्रापार ऐतिहासिक भारताची झलक!

हे प्रदर्शन 20 मार्च 2022 पर्यंत मोनाश गॅलरी ऑफ आर्टमध्ये (MAG) दाखवले जाणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

1840 च्या दशकात फोटोग्राफीचा शोध लागल्यापासून, भारतीय कला इतिहासात फोटोग्राफीने एक अविभाज्य भाग बजावला आहे. भारत हा जगातील सर्वाधिक छायाचित्रांचा देश आहे असे अनेकदा म्हटले जाते. मात्र असे असले तरी, त्याच्या प्रतिनिधित्वाचा इतिहास सुरुवातीला डोळ्यासमोर येण्यापेक्षा अधिक गुंतागुंतीचा आणि राजकीय आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये 'व्हिजन्स ऑफ इंडिया : कॉलोनियल ते कंटेम्पररी' हे भारतीय फोटोग्राफीचं प्रदर्शन सुरू आहे. हे प्रदर्शन 20 मार्च 2022 पर्यंत मोनाश गॅलरी ऑफ आर्टमध्ये (MAG) दाखवले जाणार आहे. या प्रदर्शनात भारताचा वारसा सांगणारे ब्रिटिश राजवटीच्या काळातील दर्जेदार फोटोग्राफ्स प्रदर्शित करण्यात आले आहेत.

Portrait of a courtesan, c 1860 - सवाई राम सिंग II, जयपूरचे महाराज यांनी काढलेला हा पोर्टेट फोटोग्राफ आहे. राजघराण्याच्या जनानामध्ये राहणाऱ्या एक स्त्रीचे हे पोर्ट्रेट आहे. अनौपचारिकपणे 'फोटोग्राफर प्रिन्स ऑफ इंडिया' म्हणून ओळखल्या जाणार्‍या महाराजांनी व्हिक्टोरियन पोर्ट्रेटमधील व्हिज्युअल कन्व्हेन्शन्सचा वापर यामध्ये केला. ज्यामुळे संपूर्णपणे जगापासून अलिप्त राहिलेली स्त्री आपण पाहू शकतोय. फोटो सौजन्य : सवाई राम सिंग II/ कला आणि छायाचित्रण संग्रहालया
The Queen’s room, जनाना, उदयपूर सिटी पॅलेस, उदयपूर, 2010 by Karen Knorr. या फोटोत आपल्याला एक राखाडी-पांढरा फ्लेमिंगो पक्षी खिडकीजवळ उभा दिसत आहे. हा फोटो जर्मनीत जन्मलेल्या यूएसच्या Karen Knorr यांची सीरीज इंडिया सॉन्ग मधील आहे, या फोटोचे नाव मार्गुरिट दुरासच्या 1975 च्या एका चित्रपटाच्या नावावर आहे. असे मानले जाते की, या फोटोमधून उच्चवर्णीय राजपूत संस्कृतीवर टीका करणारे आणि उपेक्षितपणा, पौराणिक कथा आणि शक्ती यांचे परीक्षण करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. फोटो सौजन्य : कॅरेन नॉर/ म्युझियम ऑफ आर्ट अँड फोटोग्राफी, बेंगळुरू
Chambhars, 1852-55 - विल्यम जॉन्सन यांनी काढलेला हो फोटो चांभार समाजातील चार सदस्यांचा आहे, लेटर-प्रेस वर्णनासह घेतलेला हा भारतीय लोकांचा फोटो भारतीय लोकांचा लिखित आणि फोटोच्या माध्यामात केलेला पहिला वांशिक अभ्यास मानला जातो. फोटो सौजन्य : विल्यम जॉन्सन/ कला आणि छायाचित्रण संग्रहालय, बेंगळुरू
नंदाच्या उत्सवादरम्यान श्रीनाथजींची पूजा करणारे एक कुटुंब, c 1940 - खुबीराम गोपीलाल हे या फोटोमध्ये त्यांच्या कुटुंबासोबत दिसत आहेत. राजस्थानातील नाथद्वारा येथील श्रीनाथजी मंदिराला भेट देणार्‍या यात्रेकरूंचे कुटुंब मनोरथ पेंटिंगचा एक भाग म्हणून चित्रित केले आहे, ज्यावर त्यांचे फोटोमधील चेहरे कापून चिकटवले आहेत. कलाकाराने त्याच्या क्लायंटसाठी कलात्मक आणि पर्सनल स्मृतिचिन्हे तयार करण्यासाठी पेंटिंग आणि फोटोग्राफीचा एकत्रितपणे वापर केला आहे. फोटो सौजन्य : खुबीराम गोपीलाल/ कला आणि छायाचित्रण संग्रहालय, बेंगळुरू
आय लेट माय हेअर लूज: प्रोटेस्ट सिरीज IV, 2010-2011 – अनोली परेरा यांनी काढलेल्या या फोटोमध्ये पोझ देणाऱ्या तरुणीचा चेहरा केसांनी झाकलेला आहे.श्रीलंकेत जन्मलेल्या, दिल्लीस्थित फोटोग्राफरने लहानपणापासून पाहिलेल्या महिलांचे पोर्ट्रेट फोटो घेण्याचा प्रयत्न करताना दिसते. स्त्रियांचे केस योग्य ठिकाणी असणे हे सौंदर्याचे लक्षण मानले जाते, तर केस मोकळे सोडणे हे उन्माद, अनियंत्रिततेचे लक्षण मानले जाते. फोटो सौजन्य : अनोली परेरा/ कला आणि छायाचित्रण संग्रहालय, बेंगळुरू
फेदर इंडियन/डॉट इंडियन, अ‍ॅन इंडियन फ्रॉम इंडिया, 2008-09 - अन्नू पलकुन्नाथू मॅथ्यू यांच्या सीरीजमधील ही जवळपास सारखी दिसणारी छायाचित्रे दोन इंडियन लोकांना एकमेकांच्या शेजारी दाखविण्यात आली आहेत. मॅथ्यूची सीरीज अ‍ॅन इंडियन फ्रॉम इंडियामध्ये भारतीय आणि मूळ अमेरिकन लोकांची ऐतिहासिक ओळख दाखवण्यात आली आहे. ज्यांना 15 व्या शतकाच्या उत्तरार्धात ख्रिस्तोफर कोलंबसच्या चुकीच्या ओळखीमुळे मुळ अमेरिकन लोकांना चुकीचे नाव मिळाले आहे. फोटो सौजन्य : अन्नू पलाकुन्नाथू मॅथ्यू/ कला आणि छायाचित्रण संग्रहालय, बेंगळुरू
अंकल हॅड हेअरी लेग्स - इंदू अँटोनी यांनी घेतलेला हा फोटो आहे, इंदू अँटोनी त्यांच्या 2017 च्या व्हिन्सेंट अंकल या सीरीजमध्ये त्यांच्या बालपणीच्या आठवणी आणि भारतीय कुटुंबातील पुरुष व्यक्तिरेखेवर आधारीत फोटोग्राफर आहेत. त्या त्यांच्या विषयांना लहान मुलांच्या दृष्टीकोनातून चित्रित करतात. फोटो सौजन्य : इंदू अँटनी/ कला आणि छायाचित्रण संग्रहालय, बेंगळुरू
अंकल हॅड हेअरी लेग्स - इंदू अँटोनी यांनी घेतलेला हा फोटो आहे, इंदू अँटोनी त्यांच्या 2017 च्या व्हिन्सेंट अंकल या सीरीजमध्ये त्यांच्या बालपणीच्या आठवणी आणि भारतीय कुटुंबातील पुरुष व्यक्तिरेखेवर आधारीत फोटोग्राफर आहेत. त्या त्यांच्या विषयांना लहान मुलांच्या दृष्टीकोनातून चित्रित करतात. फोटो सौजन्य : इंदू अँटनी/ कला आणि छायाचित्रण संग्रहालय, बेंगळुरू
हिंदुस्तान लीव्हर पाइपलाइन टू सक्सेस, 1961. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या दूरदृष्टीतून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आणि वेगाने यांत्रिकीकरण झालेल्या देशाचे प्रतिनिधित्व करणारा फोटो घेणे हा या फोटोमागील छायाचित्रकारांच्या उद्देश आहे. फोटो सौजन्य : मित्तर बेदी/ कला आणि छायाचित्रण संग्रहालय, बेंगळुरू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bhin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी ! आजपासून खात्यात जमा होणार 'इतके' पैसे

Morning Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा न तळता आख्या हिरव्या मुगाचे वडे, लगेच लिहून घ्या रेसिपी

Sushma Andhare: फलटण महिला डॉक्‍टर आत्‍महत्‍याप्रकरणी चौकशीसाठी उच्‍चस्‍तरीय समिती नेमा: सुषमा अंधारे आक्रमक; पोलिस ठाण्‍यासमोर ठिय्‍या..

Ranajitsinh Nimbalkar: मी नार्को टेस्टला तयार: रणजितसिंह नाईक-निंबाळकर; बदनामीमागे रामराजेच मास्टरमाइंड; स्क्रीनवर नेमकं काय दाखवलं?

सोलापूर शहर पोलिसांचा मोठा निर्णय! चोरट्यांना शहरात येता येणार नाही, आले तर बाहेर जाता येणार नाही; शहरात आता रात्री २१ ठिकाणी ‘सरप्राईज’ नाकाबंदी

SCROLL FOR NEXT