फोटोग्राफी

Photos : '83' सिनेमा फ्लॉप; दिग्दर्शक कबीर खान म्हणाला...

अनेकांनी या सिनेमाचं भरभरुन कौतुक केलंय पण बॉक्स ऑफिस कलेक्शनवरुन तो फ्लॉप ठरलाय

Amit Ujagare (अमित उजागरे)
सन १९८३ मध्ये भारतीय क्रिकेट संघानं पहिल्यांदा वर्ल्डकप जिंकला. भारतीयांसाठी ही मोठी अभिमानाची बाब होती. यावेळी भारतीय संघ क्रिकेट विश्वात सर्वोत्तम संघांमध्ये गणला जात नसतानाही भारतानं वर्ल्डकपवर देशाचं नाव कोरलं. त्यासाठी कर्णधार कपिल देव यांच्यासह संपूर्ण संघाला मोठा संघर्ष करावा लागला होता. यावरच आधारित 83 नावाचा सिनेमा सध्या प्रदर्शित झाला आहे. अनेकांनी हा सिनेमा पाहिल्यानंतर त्याचं कौतुक केलंय पण बॉक्स ऑफिस कलेक्शननुसार हा सिनेमा फ्लॉप ठरला आहे. याचं कारण दिग्दर्शक कबीर खाननं सांगितलंय. (Photo - google)
जे लोक हा सिनेमा पहायला चित्रपटगृहात गेले त्यांना तो प्रचंड आवडला. चित्रपट समीक्षकांनी देखील सिनेमाचं कौतुक केलं. तरी देखील प्रेक्षक चित्रपटगृहापर्यंत येऊ शकले नाहीत. यावर सिनेमाचा दिग्दर्शक कबीर खाननं कोरोनाच्या तिसरी लाटेला कारणीभूत ठरवलंय. (Photo - google)
कबीर खाननं कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला कारणीभूत ठरवलं असलं तरी फिल्म वितरक रिलायन्स एन्टरटेन्मेटचे सीईओ शिबाशिष सरकार यांनी एका मुलाखतीत सांगितलं की, ओमिक्रॉन व्हेरियंटचा चित्रपटगृहात येणाऱ्या प्रेक्षकांवर कोणताही परिणाम झालेला नाही. (Photo - google)
83 सिनेमाच्या निर्मितीसाठी निर्माते विष्णू इंदुरी यांनी मोठी मेहनत घेतली आहे. विविध खेळाडूंकडून त्यांच्यावर चित्रित होणाऱ्या सीन्सची परवानगी घेण्यासाठीच निर्मात्यांचे ६० कोटी रुपये खर्च झाले आहेत. त्यानंतर सिनेमाच्या प्रत्यक्ष निर्मितीला १२० कोटी रुपये खर्च आला आहे. या सिनेमाच्या एकूण खर्चापैकी मोठा हिस्सा याच्या ओटीटी राईट्ससाठी रिलायन्स एन्टरटेन्मेटला मिळाला आहे. या सिनेमानं विदेशातही बरी कमाई केली आहे. पण देशातील प्रेक्षकांना चित्रपटगृहापर्यंत खेचून आणण्यात या सिनेमाची मार्केटिंग टीम अपयशी ठरली आहे. (Photo - google)
कबीर खाननं म्हटलंय की, त्यांच्या अनेक मित्रांनी चित्रपटगृहात जाऊन सिनेमा पाहू शकत नसल्याबद्दल माफी मागितली आहे. कोरोनाच्या सध्याच्या वाढत्या संसर्गामुळंच हे होत असल्याचं त्यानं ठामपणे म्हटलं आहे. (Photo - google)
83 सिनेमा चित्रपटगृहात पाहताना लोक क्रिकेटच्या स्टेडियममध्ये जल्लोष करतो तसा जल्लोष करताना दिसत आहेत. लोक सिनेमाचा आनंद घेत आहेत आणि टाळ्याही वाजवताहेत. वितरक आणि चित्रपटगृहांच्या मालकांमध्येही वाद झाल्यानंही यावर परिणाम झाल्याचं बोललं जात आहे. पण कबीर खान म्हणतो की, या रुटीन गोष्टी आहेत. (Photo - google)
सिनेमाचा चांगला अनुभव घेता यावा यासाठी तो थ्रीडीमध्येही बनवण्यात आला आहे. तसेच हिंदीसह तो इतर प्रादेशिक भाषांमध्येही डब करण्यात आला आहे. सिनेमाच्या जाणकारांना असं वाटतंय की, सिनेमाचा योजनाबद्ध पद्धतीनं प्रचार झाला नसल्यानं आजच्या पिढीतील तरुणांनी या सिनेमाकडं पाठ फिरवली आहे. (Photo - google)
'स्पायडर मॅन नो वे होम' आणि 'पुष्पा' या सिनेमांचा प्रचार इतक्या प्रभावीपणे केला गेला की, लोकांनी घरोघरी त्याचा प्रचार पोहोचला. त्यामुळं या सिनेमांनी चांगला गल्ला कमावला. पण '83' सिनेमाबाबत हे घडू शकलं नाही. यासाठी एखादा मोठा इव्हेंटही आयोजित करण्यात आला नाही. (Photo - google)
पण असं असलं तरी दिग्दर्शक कबीर खान याला याचा आनंद आहे की, त्यानं एक काळाच्या मागचा सिनेमा चांगल्या पद्धतीनं बनवण्यात यश मिळवलं. त्याच्या 83 सिनेमाचं नाव अभिमानानं घेतलं जाईल. हा सिनेमा सुरु करण्यापूर्वी कबीर खाननं आपल्या टीमसह दोन वर्षे संशोधनात घालवले. (Photo - google)
दरम्यान, कबीर खान दिग्दर्शित आणि सलमान खाननं मुख्य भूमिका साकारलेला बजरंगी भाईजान या सिनेमाचा सिक्वेल येणार असल्याचे संकेत सलमान खानने दिले आहेत. पवनपुत्र भाईजान असं या सिनेमाचं नाव असेल त्याचं दिग्दर्शनही कबीर खानचं करेल पण हा सिनेमा सुरु करण्याला आणखी बराच वेळ आहे. (Photo - google)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: १९९४ चा जीआर नेमका काय आहे? मराठा समाज आरक्षणाबाहेर राहिला, कारण...

BCCI ची अब्जावधींची कमाई होते तरी कशी? भारताच्या तुलनेत पाकिस्तान क्रिकेट बोर्ड किती कमावतो पैसा, जाणून घ्या

Latest Marathi News Updates : गावातील रस्त्याना आले नदीचे स्वरूप

Pune Crime : ‘एनएचएम’ मधील अधिकारी कर्मचाऱ्यांना कोटयावधींचा गंडा; नोकरीत कायम करण्‍याच्‍या नावाखाली उकळले ७५ कोटी

Pakistan admits: मोठी बातमी! अखेर पाकिस्तानला कबूल करावंच लागलं ; 'अमेरिकेच्या मध्यस्थीसाठी कधीच तयार नव्हता भारत'

SCROLL FOR NEXT