देशातील गरीब आणि गरजू लोकांसाठी सरकार वेळोवेळी नवनवीन योजना राबवते. या योजनांतर्गत अनेक पेन्शन (Pension) योजना सुरू आहेत. या सरकारी योजनेद्वारे दर महिन्याला तुम्हाला सरकारकडून तीन हजार रुपये मिळतील. म्हणजेच तुम्हाला संपूर्ण वर्षात 36 हजार रुपयांचा लाभ मिळेल. त्यासाठी कोण अर्ज करू शकतो हे तुम्हाला माहीत आहे का? चला तर मग या योजनेबद्दल जाणून घेऊयात. प्रधानमंत्री कर्म योगी मानधन योजना (PM Karam Yogi Mandhan Yojana) असं या सरकारी योजनेचं नाव असून, त्याअंतर्गत तुम्हाला दरमहा तीन हजार रुपये दिले जाणार आहेत.
वास्तविक ही योजना सन 2019 मध्ये सुरु करण्यात आली होती. पीएम कर्म योगी मानधन योजनेअंतर्गत जीएसटी अंतर्गत नोंदणीकृत असलेले तसेच ज्यांची उलाढाल दीड कोटीपर्यंत आहे, अशा देशातील छोटे दुकानदार, व्यापारी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.याचा फायदा 18 ते 40 वयोगटातील व्यक्ती घेऊ शकता. त्याचबरोबर वयाच्या 60 वर्षानंतर दरमहा 3 हजार रुपये पेन्शन म्हणून दिले जाणार आहेत. प्रधानमंत्री कर्म योगी मानधन योजनेअंतर्गत लाभार्थ्याला पेन्शन म्हणून मिळालेली रक्कम थेट त्यांच्या खात्यात वर्ग केली जाते. अशावेळी लाभार्थ्याचे बँक खाते आधारशी लिंक करावे, ही रक्कम त्यानंतरच खात्यापर्यंत पोहोचेल.त्याचबरोबर या योजनेत अर्ज करण्याच्या नियमांबद्दल बोलायचे झाल्यास या योजनेत केवळ तेच लोक अर्ज करू शकतात, जे भारतात व्यवसाय करतात. त्याचबरोबर भारताबाहेर व्यवसाय करणारे छोटे व्यापारी या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड लागणार असून तुमचं बँक खातं आधार कार्डाशी जोडलं गेलं पाहिजे. यासोबतच जीएसटी रजिस्ट्रेशन नंबर आणि पासपोर्ट साइज फोटो लागणार आहे.अर्जदार सर्व आवश्यक कागदपत्रांसह जवळच्या सेवा केंद्रात जाऊन यासाठी अर्ज करू शकतात. येथे तुम्हाला ऑनलाइन फॉर्म भरावा लागेल आणि तुमची सर्व कागदपत्रेही द्यावी लागतील. ती सबमिट केल्यानंतर तुम्ही या योजनेत सहभागी होवू शकता.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.