PM Narendra Modi special aircraft Air India One Sakal
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे जगातील सर्वात प्रभावी नेत्यांपैकी एक आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे धाडसी निर्णय घेण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्याच्या निर्णयांमुळे कधी त्यांची वाहवा होते तर कधी ते टीकेचे धनी होतात. मोदींची कार, मोदींचे विमान एवढेच काय तर मोदींची जॅकेटसुद्धा चर्चा होत असते. पंतप्रधान मोदी सुमारे 138 कोटी भारतीयांचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेची विशेष काळजी घ्यावी लागते. साहजिकच या सर्व गोष्टींमुळे त्यांच्या प्रत्येक गोष्टींवर प्रचंड खर्चे केला जातो. पंतप्रधानांना हवाई प्रवासासाठी विशेष विमान वापरतात. त्यांच्या एक तासाच्या हवाई प्रवासाचा खर्च ऐकला तर तुम्ही चकीत व्हाल...(The Prime Minister uses a special aircraft called Air India One for air travel.)
1. पंतप्रधान नरेंद्र मोदी हवाई प्रवासासाठी एअर इंडियाचं एक खास विमान वापरतात. या विमानाचं नाव AIR INDIA ONE असं आहे.
2. भारतीय पंतप्रधानांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे अत्याधुनिक असं विशेष विमान बनवलेलं असून यामध्ये अनेक वैशिष्ट्ये आहेत, जी भारतासारख्या मोठ्या देशाच्या पंतप्रधानांची शान वाढवतील.
3. 2020 मध्ये हे विशेष विमान भारताच्या पंतप्रधानांशिवाय राष्ट्रपती तसेच उपराष्ट्रपतीही वापरू शकतात. या विमानाची किंमत तब्बल 4 हजार 229 कोटी रुपये आहे. तसेच विमानात अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणेसाठी 500 कोटींचा खर्च करण्यात आला आहे.
4. पंतप्रधान मोदींच हे विमान अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणेनं सुसज्ज असून त्यामध्ये शत्रूच्या हल्ल्यांपासून वाचण्यासाठी विशेष यंत्रणा उपलब्ध आहे. म्हणूनच या विमानाला आकाशातील बाहूबली म्हणतात. कोणतंही क्षेपणास्त्र किंवा इतर हल्ल्यांपासून हे विमान पंतप्रधानांचे संरक्षण करु शकते.
5. Air India One विमानातील अत्याधुनिक कम्युनिकेशन सिस्टीम कोणीही हॅक करू शकणार नाही, इतके हे सुरक्षित आहे. आपात्कालीन परिस्थितीमध्ये या विमानातून क्षेपणास्त्र हल्लाही करता येऊ शकतो.
6. या विशेष विमानातील इलेक्टॉनिक वॉरफेअर सिस्टीम शत्रूच्या हल्ल्यापासून संरक्षण करू शकते. शत्रूचे रडारच्या पकडीत येण्यापासून हे विमान वाचू शकते.
7. हे विशेष विमान तब्बल 900 किमी प्रतितास वेगाने उड्डाण करू शकते. तसेच सलग 17 तास न थांबता हे उड्डाण करण्याची क्षमता या विमानात आहे. हवेतल्या हवेत इंधन भरण्याच्या क्षमतेमुळे या विमानाला इंधन भरण्यासाठी जमिनीवर येण्याची गरज नाही.
8. जगातील सर्वात शक्तिशाली राष्ट्राध्यक्ष समजल्या जाणाऱ्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या विमानाएवढेच अत्याधुनिक आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या विमानाला एका तासासाठी 1 लाख 81 हजार डॉलर इतका खर्च येतो.
9. विशेष म्हणजे मोदींजींच्या हवाई प्रवासावरील खर्च सुद्धा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या एवढाच आहे. पंतप्रधान मोदींच्या हवाई खर्च तब्बल 1 कोटी 36 लाख रुपये एवढा प्रचंड असल्याचं बोललं जाते.
10. भारताचे पंतप्रधान, राष्ट्रपती ही अतिशय मोठी पद असून त्यांच्या जीवाला नेहमीच धोका असतो. त्यामुळे या विमानावर एवढा खर्च केला जातो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.