konkan news 
फोटोग्राफी

कोकणातील पठ्ठ्याची कमाल, नोकरीला रामराम ठोकत व्यवसायात घेतली भरारी

राजापुरातील युवकाने चांगल्या पगाराच्या नोकरीला रामराम ठोकत गावची वाट धरली

राजेंद्र बाईत - सकाळ वृत्तसेवा

राजापूर - घडाळ्याच्या काट्याप्रमाणे मुंबईतील जगणं सर्वसामान्यांसाठी असह्य झाले आहे. कोरोना महामारीने तर, पुरतं आर्थिक गणितचं बिघडवून टाकले आहे. त्यामध्ये नोकरी टिकविणेही आव्हानात्मक झाले आहे. अशा स्थितीमध्ये राजापूर तालुक्यातील खरवते येथील दिलीप पांडुरंग पळसमकर युवकाने चांगल्या पगाराच्या नोकरीला रामराम ठोकत गावची वाट धरली अन् कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करीत स्वतःची वेगळी वाट चोखाळली आहे.

गेल्या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये या व्यवसायातून झालेल्या उलाढालीतून त्यांना समाधानकारक उत्पन्न मिळाले आहे. एकंदरीत, स्वकर्तृत्व सिद्ध करणार्‍या या ‘अनन्या’ कुक्कुटपालन व्यवसायाच्या माध्यमातून दिलीप यांनी अर्थाजनासाठी मुंबईची वाट धरणार्‍या कोकणातील युवकांसाठी एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
गावातील जिल्हा परिषद आणि पुढे माध्यमिक शाळेमध्ये शिक्षणाचे धडे गिरवणार्‍या दिलीपने पुढे अर्थाजनासाठी नोकरी करण्याच्या उद्देशाने कोकणातील सर्वसामान्य तरूणांप्रमाणे मुंबईची वाट धरली. त्या ठिकाणी खाजगी सीएकडे चांगल्या पगाराची नोकरी करीत असताना त्याच्याजोडीने महाविद्यालयीन शिक्षणही पूर्ण केले.
मुंबईच्या धक्काधक्कीच्या नियमित जीवनाला सामोरे जात असताना त्यांच्या मनामध्ये नेहमीच स्वकर्तुत्वावर स्वतःचा व्यवसाय उभे करण्याचे विचार घोळत होते. त्यातून कमी गुंतवणूकीमध्ये कोणता व्यवसाय करता येईल याचा सोशल मिडीयावरील विविधांगी व्हिडीओंच्या माध्यमातून विचारविनिमय सुरू होता.
ग्रीन शेड उभारून त्यामध्ये गावरान कावेरी प्रजातीची शंभर पिल्लांची बॅच सुरू करत व्यवसायाचा शुभारंभ केला. ग्रीन शेडच्या बाहेर मुक्तपणे फिरणार्‍या कोंबड्या त्या ठिकाणाहून बाहेर जंगलामध्ये जावू नयेत म्हणून त्यांनी नायलॉन जाळ्यांचे कुंपण तयार केले आहे. दहा दिवसांच्या कुक्कुटपालन प्रशिक्षणाची जोड मिळाल्याने त्याचा फायदा या व्यवसायासाठी झाल्याचे दिलीप सांगतात.
सद्यस्थितीमध्ये स्थानिक बाजारपेठेमध्ये अंड्यांची विक्री केली जात असून भविष्यामध्ये कटींगसाठी कोंबड्यांची विक्री करण्याचा मानस असल्याचे ते सांगतात. कुक्कुटपालनच्या जोडीला त्यांनी गांडुळखत आणि भाजीपाला लागवड अन् विक्रीचाही व्यवसाय करतात. या व्यवसायामध्ये वडील पांडुरंग, आई लक्ष्मी, पत्नी दिपाली, मावशी लक्ष्मी भिकणे, मित्र गणेश, नामदेव गोंडाळ आदींचे सहकार्य, मार्गदर्शन लाभल्याचे दिलीप सांगतात.
लोकवस्तीपासून सुमारे दिड किमी. अंतरावरील डोंगर अन् जंगल परिसरामध्ये ‘अनन्या’ कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला आहे. जंगल परिसरातून पायपीट करीत जा-ये कराव्या लागत असलेल्या या परिसरामध्ये जंगली श्‍वापदे आणि बिबट्यांचा मोठ्याप्रमाणात वावर असतो. कोंबड्यासाठी उभारण्यात आलेल्या ग्रीन शेडमध्ये घुसण्याचा बिबट्याने एकदा प्रयत्न केल्याचा अनुभव दिलीप यांचे वडील पांडुरंग यांनी सांगितला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT