नाशिक : पुणे येथील श्रुतीसागर आश्रमाच्या माध्यमातून वाढोली (ता. त्र्यंबकेश्वर) येथे शिवशक्ती ज्ञानपीठाच्या आश्रमात श्री स्वरूपेश्वर बाणेश्वर महादेव मंदिरात पर्यटकांची गर्दी होत आहे. अंजनेरी पर्वतरांगेत प्रतिकेदारनाथ म्हणून प्रचलित होत असलेल्या या मंदिराकडे भाविक आकर्षित होत आहेत. २०१४मध्ये लोकार्पण झालेल्या या मंदिराविषयी सोशल माध्यमावर फोटो, व्हिडियो व्हायरल झाल्यानंतर तब्बल सात वर्षांनी या मंदिराची माहिती भाविकांना मिळत आहे. गेल्या महिनाभरापासून मंदिरात दर्शनासाठी प्रचंड गर्दी वाढली आहे.
माताजी स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती यांच्या संकल्पनेतून या मंदिराची संकल्पना पुढे आली आहे. अंजनेरी पर्वतरांगांमध्ये चार एकर जागेत साकारलेल्या या मंदिर परिसरात भक्त निवास, भगवत्पूज्यपाद आदि शंकराचार्य आश्रम, दुर्गा परमेश्वरी मंदिर पर्यटनाचे केंद्रबिंदू ठरत आहे. जनसामान्यांमध्ये अध्यात्मविद्येचा प्रचार, प्रसार करण्यासाठी आश्रम पुण्यानंतर त्र्यंबकेश्वरमध्ये स्थापन करण्यात आले आहे. साधनेसाठी पवित्र, अनुकूल स्थान असल्याने याठिकाणी अनेक साधूसंत येतात. esakalशिवशक्ती ज्ञानपीठातर्फे येथे प्रत्येक महिन्याला वेद, वेदांत शिबीर घेण्यात येते. तसेच, मंदिरात महाशिवरात्री, श्रावण, गुरूपोर्णिमा, नित्य अन्नदान, भगवपूज्यपाद आदि शंकराचार्य जयंती, नर्मदा जयंतीनिमित्त मोठा उत्सव होतो. मंदिर परिसरात छायाचित्र, शुटींग काढण्यावर बंदी आहे. पंरतू, सोशल माध्यमावर मंदिराचे छायाचित्र, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रति-केदारनाथ म्हणून या मंदिराकडे भाविक आकर्षित झाले असून महाराष्ट्रात असे पहिलेच मंदिर असल्याची माहिती पंढरीनाथ महाराज यांनी दिली. प्रति-केदारनाथ म्हणून प्रचलित झालेल्या मंदिरात मुंबई, पुण्याहून भाविक येत असल्याचे चित्र आहे.गेल्या महिनाभरापासून मंदिरात दर्शनासाठी प्रचंड गर्दी वाढली असून, भाविकांना सेल्फी घेण्याचा मोह होत असल्याचे चित्र आहे. Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.