फोटोग्राफी

Health News : प्रोडक्टिविटी वाढवायची आहे ? या गोष्टींचा करा जेवणात समावेश

जर तुम्हाला स्वतःमध्ये उत्पादकतेची कमतरता जाणवत असेल तर घाबरू नका.

सकाळ डिजिटल टीम

जेव्हा आपण शरीराच्या उत्पादकतेबद्दल बोलत असतो, तेव्हा आपल्या स्नॅकच्या निवडीचे मोजमाप करणे महत्त्वाचे ठरते. यासाठी आम्ही तुम्हाला अशाच काही पदार्थांबद्दल सांगणार आहोत, जे तुमची उत्पादकता वाढवतील. सतत काम केल्याने तुमच्या शरीरातील ऊर्जा उत्पादकतेवरही परिणाम होतो. जेव्हा ऊर्जेची उत्पादकता कमी होते, तेव्हा आपण लक्ष केंद्रित करू शकत नाही. त्यामुळे कोणतेही काम आपल्यासाठी ओझ्यासारखे वाटायला लागते. परिणामी आपण लवकर थकतो. परंतु, जर तुम्हाला स्वतःमध्ये उत्पादकतेची कमतरता जाणवत असेल तर घाबरू नका. आज आम्ही तुम्हाला अशाच काही पदार्थांबद्दल सांगणार आहोत. ज्यामुळे तुमच्या शरीरातील उत्पादकता वाढेल.

डार्क चॉकलेट : चॉकलेटमध्ये अनेक पोषक घटक असतात, असे मानले जाते. डार्क चॉकलेटमध्ये असलेली साखर आणि कॅफिन उत्पादकता वाढवण्यास मदत करतात. यामध्ये असलेले मॅग्नेशियम तुमचे मन शांत करण्यास मदत करते.
अंडी : अंड्यांमध्ये ओमेगा ३ आणि व्हिटॅमिन 'बी' आढळते. हे आपली स्मरणशक्ती सुधारण्यास आणि प्रतिक्रिया देण्यासाठी लागणारा वेळ वेगवान करण्यासाठी मदत करते. शिवाय ते तुमच्या आरोग्यासाठीही फायदेशीर ठरू शकते.
बदाम : लहानपणी अनेकदा स्मरणशक्ती वाढवण्यासाठी बदाम खाण्यास सांगितले जाते. बदामामध्ये निरोगी चरबी आणि आवश्यक कॅलरीज असतात, जे तुम्हाला दिवसभर ऊर्जा देण्याचे काम करतात. यामुळे तुमची उत्पादकताही वाढते.
अक्रोड : अक्रोड हे तुमच्या मेंदूच्या शक्ती आणि स्मरणशक्तीसाठी चांगले आहे. ते अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन ई आणि अमीनो ऍसिडने समृद्ध असतात. अक्रोड तुमच्या मेंदूची कार्यक्षमता सुधारण्यास मदत करू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अवकाश विज्ञान तुमच्या दारी! नववीच्या विद्यार्थ्यांसाठी ISRO कडून सुवर्णसंधी; ‘युविका 2026’ साठी प्रक्रिया सुरू, कुठे अन कसा अर्ज कराल? वाचा सविस्तर

Farmer Success Story: वाट्याने शेत घेऊन अडीच एकरांत १२ लाखांचे खरबुजाचे उत्पादन; वांगीतील चौधरी भावंडांनी घेतले ५० टन फळ; व्यवस्थापनातून अडचणींवर मात!

IND vs SA : 'गौतम, सूर्या यांच्या दोन चुकांमुळे भारतीय संघ हरला'; द. आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर R Ashwin चांगलाच संतापला

Shaktipeeth Highway: शक्तिपीठसाठी जबरदस्तीने मोजणीचे राज्यभर पडसाद; परभणीतील महिला शेतकऱ्यांना मारहाण, बाधित शेतकरी संतप्त!

'तुझं नशीबच खूप चांगलं आहे गं' म्हणणाऱ्या बायकांना तेजश्री प्रधानने सुनावलं; म्हणाली, 'मी रात्रभर रडले...'

SCROLL FOR NEXT