आज 14 फेब्रुवारी...आजचा दिवस जगभरात प्रेमाचा दिवस म्हणजेच 'व्हॅलेन्टाईन्स डे' (Valentines Day) म्हणून साजरा केला जातो. पण हा दिवस भारतीयांच्या (Indian) दृष्टीने डोळ्यांत पाणी आणणारा आहे. कारण 2019 मध्ये याच दिवशी पुलवामांमध्ये (Pulwama) अतिरेकी हल्ल्यामध्ये (terrorist attack) सीआरपीएफच्या 40 जवान शहीद झाले होते. आज या घटनेला तीन वर्ष पूर्ण होत आहेत. (40 Indian soldiers were killed in a terrorist attack in Pulwama, Jammu and Kashmir, On 14 February 2019,.)
1. पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याला तीन वर्षे पूर्ण झाले आहेत. परंतु भारतीय जवानांनी दिलेलं बलिदान आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या डोळ्यातील पाणी अजूनही देश विसरला नाही.2. 14 फेब्रुवारी 2019 रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 40 भारतीय जवान शहीद झाले होते. या हल्ल्याला भारतानेही चोख प्रत्युत्तर दिले होते. 3. काश्मिरच्या पुलवामा जिल्ह्यात 2500 भारतीय जवानांना घेऊन जाणाऱ्या 78 गाड्यांच्या ताफ्यावर दुपारी साडेतीनच्या सुमारास दहशतवाद्यांनी हल्ला भ्याड हल्ला केला होता. 4. जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याने विस्फोटकाने भरलेली कार जवानांच्या ताफ्याला नेऊन धडकवली. त्यामुळे झालेल्या भयानक स्फोटात बसच्या चिंधड्या उडाल्या. या हल्ल्यात भारताचे 40 शूर जवान शहीद झाले. तर अनेक जवान जखमी झाले. 5. व्हॅलेंटाईन डेचा उत्सव साजरा करणारा देश, जवानांवरील हल्ल्याच्या दु:खात बुडाला. अनेकांनी व्हॅलेंटाईनचा आनंद दूर लोटला. पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची आणि धडा शिकवण्याची मागणी जोर धरु लागली.
6. पुलवामावर झालेल्या हल्ल्याच्या दोन आठवड्यानंतर म्हणजे 26 फेब्रुवारीला भारतीय एअर फोर्सने पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईल केला आणि दहशतवाद्यांचे अनेक तळ उद्धवस्त केले. भारताच्या 40 जवानांच्या बदल्यात एअर फोर्सने जवळपास 300 पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. 7. पुलवामा हल्ल्याला दोन वर्ष पुर्ण झाली असली तरी अजुनही काही प्रश्न अनुत्तरीतच आहेत. हल्ल्यासाठी Maruti Eeco कार वापरण्यात आली होती. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कारमध्ये 25 किलो आरडीएक्स होते. पण, इतक्या मोठ्या प्रमाणात आरडीएक्स कोठून आले याचा पता लागलेला नाही. सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.