Ram Mandir Sakal
फोटोग्राफी

Photos: 20 किलो दोरा, 25 दिवसांची मेहनत, अखेर अयोध्येतील राम मंदिर साकारलंच

दत्ता लवांडे

कोरोना संकटानंतर यावर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. ठिकठिकाणी आकर्षक देखावे पाहायला मिळत आहेत. सार्वजनिक गणेश मंडळचं नाही तर घरोघरी आकर्षक देखावे तुम्ही पाहिले असतील. मात्र अयोध्येतील प्रभू श्रीराम जन्मभूमी मंदिराचा देखावा तुम्ही अजून पहिला नसेल. पुण्यातील खराडी परिसरातील शैलेंद्र संगीता राजेंद्र कस्तुरी या तरुणाने त्याच्या राहत्या घरी गणेशोत्सवानिमित्त अगदी हुबेहूब श्री राम मंदिराची प्रतिकृती साकार केली आहे. यासाठी २५ दिवसांची मेहनत त्याने घेतली आहे.

श्रीराम मंदिराची प्रतिकृती जितकी आकर्षक दिसत आहे तितकीच कठोर मेहनत शैलेंद्र कस्तुरी आणि त्यांचे कुटुंबीय, मित्र परिवार यांनी मागच्या एक महिन्यापासून घेतली आहे. फोटो - शैलेंद्र कस्तुरी
अयोध्येतील राम मंदिराचा देखावा साकार करण्याची संकल्पना ही स्वतः शैलेंद्र कस्तुरी यांची असून नऊ ऑगस्ट पासून त्यांनी या कामाला सुरुवात केली होती. तर तीन सप्टेंबरला हे राम मंदिर पूर्णपणे साकार झालं. फोटो - शैलेंद्र कस्तुरी
पाऊणे आठ फूट बाय साडेपाच बाय बेचाळीस इंच अशी एकंदरीत या प्रतिकृतीची लांबी रुंदी उंची आहे. तर या मंदिर उभारणीसाठी मुख्यतः लाकूड, पुठ्ठा, दोरा यांचा वापर करण्यात आला आहे. फोटो - शैलेंद्र कस्तुरी
या प्रतिकृतीसाठी 120 कमान, 250 कॉलमस्, 30 ते 40 शीटस, 20 किलो दोरा (10mm, 5mm, 3mm, 2mm) वापरण्यात आला आहे. फोटो - शैलेंद्र कस्तुरी
या मंदिरासाठी 45 हजार रुपयांचा खर्च शैलेंद्र यांनी केला असून याचा कच्चा आराखडा तयार करण्यासाठी दहा दिवसांचा कालावधी लागला आहे. तर मंदिर पूर्णपणे साकार करण्यासाठी एकूण 25 दिवसांचा कालावधी लागला आहे. फोटो - शैलेंद्र कस्तुरी
2021 मध्ये शैलेंद्र यांनी केदारनाथ मंदिराचा देखावा साकार केला होता तेव्हा त्यांच्या देखाव्याला अख्ख्या पुण्यातून टॉप 5 मध्ये पारितोषिक मिळालं होतं. फोटो - शैलेंद्र कस्तुरी
एखादी वास्तू साकारण्यासाठी इंजिनिअर किंवा आर्किटेक्चर असण्याची गरज नाही तर इच्छा शक्ती प्रबळ असायला पाहिजे. आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे शैलेंद्र कस्तुरी यांनी साकारलेले श्रीराम मंदिर. फोटो - शैलेंद्र कस्तुरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील नांदणी तपासणी नाक्यावर लाच घेणारा आरटीओ निरीक्षक व खासगी व्यक्ती रंगेहाथ सापडला, ड्रॉव्हरमध्ये किती रुपये, वाचा...

Islapur News : बँकेच्या कर्जाला कंटाळुन एका शेतकऱ्याने गळफास घेऊन संपविले जीवन

Vehicle Fitness Test: आरटीओची मोठी डिजिटल झेप! ६ मिनिटांत वाहनांची फिटनेस तपासणी करणार, नवीन प्रणाली कधी लागू करणार?

Pune BJP leads in campaign : पुण्यात भाजपचा प्रचाराचा धडाका!, महापालिका निवडणुकीसाठी जबरदस्त नियोजन

Ajit Pawar: धनंजय मुंडेंना पुन्हा संधी! राष्ट्रवादीची यादी जाहीर; नेत्यांची संपूर्ण लिस्ट पाहा

SCROLL FOR NEXT