Pune Metro Trial Run शहाजी जाधव
पुणेकरांसाठी एक चांगली बातमी आहे. पुणे मेट्रोची आज सकाळी ७ वाजता ट्रायल रन पार पडलीपालकमंत्री अजित पवार आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत ट्रायल रन झाली. कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ३ किलोमीटरचा टप्पा तयार आहे. पीएमसी क्षेत्रातील वनाज-रामवाडी मार्गिकेतील, वनाज-आयडीयल कॉलनी मार्गावरील पुणेमेट्रोच्या प्रथम 'ट्रायल रन'ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला व पुणे मेट्रो कोचच्या प्रतिकृतीचे अनावरण करण्यात आले.'पुणवडी ते पुणे हा पुणेकरांच्या कष्टाचा, मेहनतीचा. स्वप्नपुर्तीचा प्रवास आहे. आजच्या मेट्रो ट्रायल रनमुळे पुण्याला आधुनिक ओळख मिळणार आहे. पुण्याच्या विकासाचे आणखी एक स्वप्न पुर्ण होतेय याचा आम्हाला आनंद आहे'' अशा भावना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केल्या.महापौर मुरलीधर मोहोळ, निलम गो-हे, आमदार सिध्दार्थ शिरोळे, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, सभागृह नेते गणेश बीडकर, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दिक्षित व्यासपीठावर उपस्थित होते.१० जुलैला वनाज ते गरवारे कॉलेज दरम्यान पुणे मेट्रोची तांत्रिक चाचणी झाली होती. "शुक्रवारच्या ट्रायल रनसाठी आम्ही तयार आहोत. यासंबंधीची सविस्तर माहिती नंतर देऊ" असे पुणे मेट्रोच्या अधिकाऱ्याने काल सांगितले.यापूवी पुणे मेट्रोची पिंपरी चिंचवड ते फुगेवाडी दरम्यान ६ किमीच्या पट्टयात ट्रायल रन घेण्यात आली होती. उर्वरित पट्टयाचे काम प्रगतीपथावर आहे.शिवाजीनगर ते बुधवार पेठ दरम्यान जमिनीखालून बांधण्यात येणाऱ्या बोगद्याचे निम्मे काम पूर्ण झाले आहे. कोरोना काळातील लॉकडाउनचा पुणे मेट्रोच्या कामाला फटका बसला होता. त्यामुळे प्रकल्पाची मुदत वाढवण्यात आली आहे.पुणे महानगरपालिका क्षेत्रातील पूर्व- पश्चिम वनाज ते रामवाडी मार्गिकेतील वनाज ते आयडीयल कॉलनी या पुणे मेट्रोच्या प्रथम ट्रायल पूर्णपुणे महानगरपालिका क्षेत्रातील वनाज ते रामवाडी कॉरिडॉरमधील पूर्ण झालेल्या मार्गिकेवरील पुणे मेट्रोच्या ईस्ट-वेस्ट कॉरिडॉरच्या ट्रायल रनचे उदघाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिरवा झेंडा दाखवून सकाळी सात वाजता केले.उपमुख्यमंत्री, यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या प्रथम 'ट्रायल रन' ला हिरवा सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.