Bhagwant Mann Wedding Photos esakal
फोटोग्राफी

Photos : साध्या पद्धतीनं झाला CM भगवंत मान यांचा लग्नसोहळा; पाहा खास क्षण

भगवंत मान यांचा हा दुसरा विवाह आहे.नुकतेच लग्नसोहळ्यातले काही फोटोज पुढे आले आहेत.

सकाळ डिजिटल टीम
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकले आहेत.चंदीगढ येथील गुरूद्वारामध्ये आयोजित खासगी समारंभामध्ये हा विवाहसोहळा पार पडला.
नुकतेच त्यांच्या लग्नसोहळ्यातील काही फोटोज पुढे आले आहेत.भगवंत मान यांनी डॉ.गुरप्रित कौर हिच्याशी लग्न केलंय.दोघेही लग्न सोहळ्यात शोभून दिसताय.
भगवंत मान यांचा हा दुसरा विवाह आहे.खाजगी पद्धतीने पार पडलेल्या या विवाह सोहळ्यात भगवंत मान यांच्याकडील २० आणि गुरप्रित यांच्याकडील २० लोक सहभागी झाले होते.
या लग्नाला विशेष अतिथी म्हणून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित होते.यावेळी अरविंद केजरीवाल यांनी नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद दिले.
भगवंत मान आणि त्यांची पहिली पत्नी इंद्रपीत यांचा सहा वर्षाआधी घटस्फोट झाला असून ती मुलांसह सध्या अमेरिकेत राहातेय.मात्र मान यांची दोन्ही मुले शपथविधी सोहळ्याला आली होती.
भगवंत मान यांची आई हरपाल कौर यांची 'आपल्या मुलाने पुन्हा लग्न करावे', अशी ईच्छा होती.आईच्या ईच्छेचा मान ठेवत भगवंत मान यांनी आईने आणि बहिणीने निवडलेल्या मुलीशी म्हणजेच गुरप्रितशी लग्न केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

NDA ला मोठा धक्का! 2026 नंतर आघाडीमध्ये पहिली फूट पडली; मोठ्या मित्रपक्षाने साथ सोडली, राजकीय समीकरणे बदलणार?

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

Manchar Crime : मंचरमध्ये तरुणीला कालव्यात ढकलण्याची धक्कादायक घटना; आरोपी तरुण अटकेत, एनडीआरएफकडून तीव्र शोधमोहीम

SCROLL FOR NEXT