ब्रिटनमध्ये जी 7 परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. जी 7 देशांचे नेते या परिषदेसाठी उपस्थित राहिले आहेत.
जी 7 देशांच्या नेत्यांसाठी महाराणी एलिझाबेथ यांनी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी सर्व नेत्यांसोबत एलिझाबेथ यांनी एकत्र फोटोही काढून घेतला. दरम्यान, महाराणी एलिझाबेथ यांच्या उपस्थितीत होत असलेल्या या कार्यक्रमावेळी नेते सहजपणे वावरत नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर ज्यो बायडेन हे पहिल्यांदाच महाराणी एलिझाबेथ यांना भेटले.तेव्हा एलिझाबेथ यांनी नेत्यांना म्हटलं की, तुम्ही इथं आनंद घेत आहात असं वाटलं पाहिजे. यानंतर सर्वच नेते खळखळून हसले. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हेसुद्धा यावेळी उपस्थित होते. त्यांनीही महाराणींच्या म्हणण्यावर उत्तर देताना म्हटलं की, आम्ही इथं आनंद घेतोय. महाराणी एलिझाबेथ यांच्या 69 वर्षांच्या कार्यकाळात बायडेन हे 13 वे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आहेत जे त्यांना भेटले. Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.