sakal
फोटोग्राफी

डी कॉकच्या पत्नीला आनंद अनावर, मुलीला घेतलं 'बाहुबली' सारखं डोक्यावर

सामन्याचा विजयचा हिरो ठरला लखनौ संघाचा यष्टिरक्षक-फलंदाज क्विंटन डी कॉक

Kiran Mahanavar

आयपीएलच्या हंगामात लखनौ सुपर जायंट्सने शानदार विजय मिळवला. बुधवारी झालेल्या सामन्यात लखनौ संघाने कोलकाता नाईट रायडर्सचा 2 धावांनी पराभव केला. सामन्याचा विजयचा हिरो ठरला लखनौ संघाचा यष्टिरक्षक-फलंदाज क्विंटन डी कॉक, ज्याने 70 चेंडूत नाबाद 140 धावा केल्या.

क्विंटन डी कॉकला सामनावीर म्हणून बक्षीस मिळाले. ज्या क्षणी डी कॉकने शतक पूर्ण केले, तो क्षण त्याच्यासाठी आणखीनच खास ठरला.
डेकॉकने शतक पूर्ण करताच, स्टँडवर बसलेल्या त्याची पत्नी शाशाने आपल्या 4 महिन्यांच्या मुलीला 'बाहुबली' चित्रपटाप्रमाणे हवेत उंच करून आनंद केला.
दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक ७ जानेवारी रोजी वडील झाला. त्याची पत्नी शाशा हिने एका मुलीला जन्म दिला.
डे कॉकने आपल्या मुलीचे नाव कियारा ठेवले आहे. या खेळाडूने आपल्या मुलीच्या जन्माच्या एक आठवडा आधी म्हणजे 31 डिसेंबर रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.
मेगा लिलावात लखनौ संघाने डेकॉकला 6.75 कोटी रुपयांची बोली लावली आणि विकत घेतले.
डी कॉकने या हंगामात आतापर्यंत 14 सामने खेळले असून त्यात त्याने 502 धावा केल्या आहेत. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे.
सामन्यात लखनौ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना एकही विकेट न गमावता 210 धावा केल्या. डी कॉकशिवाय कर्णधार केएल राहुलने 51 चेंडूत 68 धावांची खेळी खेळली.
प्रत्युत्तरात कोलकाता संघ 8 विकेट्सवर 208 धावाच करू शकला आणि सामना 2 धावांनी हरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray targets Mumbai Mayor : बांगलादेशी घुसखोरांवरून आदित्य ठाकरेंचा मुंबईच्या महापौरांना टोला अन् भाजपला सवाल, म्हणाले...

Valentine Day 2026 Marathi Wishes: 'व्हॅलेंटाईन डे' निमित्त तुमच्या प्रेमळ व्यक्तीला पाठवा हृदयस्पर्शी शुभेच्छा, प्रेमाचा दिवस बनेल स्पेशल

Indian Passport Ranking : भारतीय 'पासपोर्ट रँकिंग'मध्ये मोठी सुधारणा!, आता ५६ देशांमध्ये 'Visa-Free' एन्ट्री करता येणार

USA vs NED : अमेरिकेच्या विजयात पुणे, मुंबईचे खेळाडू चमकले; नेदरलँड्सचा पराभव पाकिस्तानच्या पथ्यावर, अ गटाचे चित्र स्पष्ट

अभ्यास करा..! पाचवी अन्‌ आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा २२ फेब्रुवारीला; परीक्षेत दोन पेपर, १५० गुणांचा वस्तुनिष्ठ प्रश्न, वाचा...

SCROLL FOR NEXT