जगभरात पशुपक्ष्याच्या अनेक प्रजाती आहेत. प्रत्येक प्राण्याचे (Animal) काहीतरी वैशिष्ट्य असते. यापैकी काही प्राणी त्यांच्या विचित्र सवयींसाठी ओळखले जातात. जगात असा एक प्राणी आहे, ज्याची विचित्र सवय ऐकून तुम्ही आश्चर्यचकीत व्हाल. हा प्राणी इतका विचित्र आहे की तो स्वतःची विष्ठा खातो. विश्वास बसत नाही ना? पण हे खरं आहे. या प्राण्याचं नाव आहे ‘ससा’(Rabbit). ससा हा असा प्राणी आहे, जो स्वतःची विष्ठा खातो. ससा असं का करतो, हे आज आपण जाणून घेणार आहोत. (Rabbit is the only animal in the world that eats its Potty)
1. सशांच्या चांगल्या आरोग्यासाठी स्वतःची विष्ठा खाणे ही एक आवश्यक प्रक्रिया आहे. वास्तविक ससा हा असा जीव आहे ज्याची पचनसंस्था फारशी विकसित नाही. सशांचं मुख्य खाद्य आहे गवत...गवत खाऊन ससा आपलं आयुष्य घालवतो. अनेक आवश्यक पोषक द्रव्ये त्यांच्या शरीरातून पचल्याशिवाय बाहेर पडतात, म्हणून ससे स्वतःची विष्ठा खातात आणि अधिकाधिक पोषक तत्वे शरीरात घेतात.2. गाय आणि म्हशीसारखे प्राणी रवंथ करतात. म्हणजेच खाल्लेलं अन्न पुन्हा तोंडात आणतात आणि ते बारिक चावून ते पचवतात. परंतु सशाला तसं करता येत नाही त्यामुळे तो त्याची विष्ठा खातो. 3. सशाची विष्ठा दोन प्रकारची असते. एक पातळ द्रवरुपात तर दुसरी टॅब्लेट अर्थात लेंडी रुपात... पहिल्या प्रकारच्या विष्ठेला सीकोट्रोप म्हणतात. त्यात भरपूर पोषक तत्व असतात, जी द्रव स्वरूपात शरीरातून बाहेर पडतात. ससे ही विष्ठा खातात. ती पूर्णपणे पचते आणि मग लेंडी रुपात पुन्हा विष्ठा करतात. 4. सेकोट्रोप विष्ठेमध्ये लेंडीसारख्या विष्ठेपेक्षा दुप्पट द्रवपदार्थ असतात. त्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन बी 12 असते. जर सशांनी लिक्विड विष्ठा खाल्ली नाही, तर बहुतेक पोषक तत्व पचल्याशिवाय शरीरातून काढून टाकली जातील.5.ससे हा शाकाहारी प्राणी आहे. तो फक्त गवत आणि भाज्या खातो. त्यांच्या शरीरासाठी फायबर खूप महत्वाचे आहे. रात्रीच्या वेळी त्यांची पचनसंस्था जलद कार्य करते आणि बरेच अन्न पचवल्याशिवाय फेकून देते. म्हणूनच ते अनेकदा ही विष्ठा रात्री करतात आणि त्याच वेळी ती खातात. त्यानंतर पूर्णपणे पचण होतं आणि बाहेर येते. हीच लेंडी विष्ठा असते. 6. गाई म्हशी त्यांचे अन्न खाल्ल्यानंतर ते एकामागून एक घशात आणतात आणि पूर्णपणे पचवतात. यालाच आपण रवंथ म्हणतो. येथे त्यांच्या अन्नातील फायबर बॅक्टेरियाद्वारे पचवले जाते. त्यामुळे त्यांना अन्नातून अधिकाधिक पोषक तत्वे मिळू शकतात.7. प्राण्यांच्या जगात ससा हा एकमेव प्राणी नाही जो त्याची विष्ठा खातो. ही प्रवृत्ती गिनीपिग, लहान उंदीर आणि तत्सम शाकाहारी प्राण्यांमध्ये आढळते.8. जे जीव इतरांची विष्ठा खातात तेदेखील पर्यावरणासाठी खूप फायदेशीर असते. लहान जिवाणूंपासून ते डुकरांसारख्या मोठ्या प्राण्यांपर्यंत इतरांची विष्ठा खाऊन पर्यावरण स्वच्छ ठेवण्यास मदत करतात.9. सशाबद्दल एक खास गोष्ट सांगायची झाली तर सशांच्या कानांच्या स्थितीद्वारे त्यांच्या भावना समजून घेता येतात. सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.