Raj kaveri wedding photo Bhagya Dile Tu Mala serial colors marathi sakal
फोटोग्राफी

Bhagya Dile Tu Mala: लाखात एक जोडा! राज कावेरीच्या लग्नाचे फोटो व्हायरल..

अखेर राज आणि कावेरी आले एकत्र, दणक्यात पार पडला विवाहसोहळा..

नीलेश अडसूळ
लग्न म्हणजे नव्या आयुष्याची सुरुवात... जन्मभराचे ऋणानुबंध. प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचा क्षण. आणि हाच क्षण आता आपल्या राज आणि कावेरीच्या आयुष्यात आला आहे.
मोठ्या धुमधडाक्यात या दोघांचे लग्न होणार आहे. ज्या क्षणाची वाट राज कावेरीसोबत अख्खा महाराष्ट्र बघत होता तो क्षण आता जवळ आला आहे.
राज कावेरीच्या हळूवार प्रेमाची गोष्ट प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आणि हे दोघे कधी एकत्र येणार याची उत्सुकता आपल्या सगळ्यांना लागून राहिली होती.
एकीकडे स्वत:ची संस्कृती जपण्याचा ध्यास असणारी आणि परंपरेचा डोळस अभिमान बाळगणारी कावेरी तर दुसरीकडे नाविन्याची कास असणारा राजवर्धन एकेमकांना समोर आले आंणि दोघांमध्ये हळुवार प्रेम फुलत गेले.
कावेरी आणि राजवर्धनच्या या गोष्टीमध्ये अनेक अनपेक्षित वळण आली, कधी गैरसमज तर कधी प्रेम तर कधी भांडणाची वादळ, कधी दुरावा… एकमेकांच्या साथीने सगळ्यांशी लढत आता तो शुभ दिवस आला आहे.
या लग्नसोहळ्याचे चित्रीकरण झाले असून नुकतेच काही फोटो समोर आले आहेत. प्रेक्षकांना मात्र हा सोहळा पाहण्यासाठी 26 फेब्रुवारीपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
या लग्नासाठी कावेरीचा खास मराठमोळा लूक असणार आहे नऊवारी, नथ, शेला, हिरवा चुडा या लुकमध्ये कावेरी खूप सुंदर दिसत आहे. दोघांचाही अस्सल मराठमोळा बाज दिसून येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! ७ महिने झाले अनाथांना मिळाले नाहीत बालसंगोपन योजनेचे पैसे; राज्यातील सव्वालाख चिमुकल्यांचे हाल; दरमहा अपेक्षित आहेत २२५० रुपये

आजचे राशिभविष्य - 4 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : कोल्हापुरात पंचगंगेच्या पातळीत एक फुटाने वाढ, ५० बंधारे पाण्याखाली

अग्रलेख : मूक आक्रंदनाचा वारसा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 4 जुलै 2025

SCROLL FOR NEXT