Rakesh JhunJhunwala News esakal
rakesh jhunjhunwala no more : शेयर मार्केटचा बिग बुल अशी ओळख असणाऱ्या राकेश झुनझुनवाला यांचे आज निधन झाले आहे. त्यांच्या जाण्यानं भारतीय शेयर मार्केटला मोठा झटका बसला आहे. आपल्या वेगळ्या अंदाजामुळे भारतीय उद्योजकांमध्ये प्रसिद्ध असणारे झुनझुनवालांची लोकप्रियता मोठी होती. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना राकेश झुनझुनवाला कोण आहेत हे माहिती असतेच. आपल्या नावाचा एवढा मोठा दबदबा त्यांनी तयार केला आहे. त्यांच्या निधनानं देशाच्या पंतप्रधानांसह अनेक बड्या नेत्यांनी झुनझुनवाला यांना आदरांजली वाहिली आहे. असं म्हटलं जातं की झुनझुनवाला यांची बॉलीवूडमध्ये देखील मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होती.
शमिताभ, की अँड का..
इंग्लिश विंग्लिशनंतर त्यांनी दोन चित्रपटांची निर्मिती केली होती. त्यात अमिताभ यांचा शमिताभ आणि अर्जुन, करिनाच्या की अँड का च्या नावाचा समावेश होता. या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले होते. की अँड का ने 52 कोटींची कमाई केली होती.
अर्जुन कपूर आणि करिनाची मुख्य भूमिका असलेल्या की - का ला प्रेक्षकांचा काही खास प्रतिसाद मिळाला नव्हता. मात्र त्यातील नवीन संकल्पनेनं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. झुनझुनवाला यांना या चित्रपटानं मोठी साथ दिल्याचे बोलले जाते. राकेश झुनझुनवाला यांची एकुण संपत्ती-
शेअर बाजारातील मोठं नाव म्हणून राकेश झुनझुनवाला यांच्याकडे पाहिले जाते. त्यांनी आपल्या महाविद्यालयीन आयुष्यापासूनच शेअर मार्केटला सुरुवात केली होती. ते सीए होते. 1985 मध्ये पाच हजार रुपयांपासून राकेश यांनी गुंतवणूकीला सुरुवात केली होती. 2018 पर्यत तो आकडा अकरा हजार कोटी रुपयांचा होता.
मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेणाऱ्या राकेश झुनझुनवाला यांचे बॉलीवूडशी खास नाते होते. बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवीच्या इंग्लिश विंग्लिशमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली होती. 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं 80 कोटींची कमाई केली होती. सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.