आंजर्ले समुद्रकिनारा sakal
फोटोग्राफी

रत्नागिरी : प्रसिद्ध पर्यटन स्थळे

रत्‍नागिरी जिल्ह्याला १६७ किमी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला असून इथले शुभ्र, रुपेरी वाळूचे सुंदर किनारे पर्यटकांना नेहमीच आपल्याकडे आकर्षित करतात.

तेजस भागवत
थिबा राजवाडा हा ब्रम्हदेशच्या(आत्ताचं म्यानमार) थिबा मिन नावाच्या राजाला नजरकैदेत ठेवण्यासाठी ब्रिटिशांनी बांधलेला रत्नागिरी येथील राजवाडा आहे. याची बांधणी १९१० मध्ये करण्यात आली. १९१६ पर्यंत या राजवाड्यात म्यानमारच्या राजा व राणीचं वास्तव्य होतं. आता या राजवाडयात एक प्रादेशिक वस्तुसंग्रहालय आहे.
रत्‍नागिरी शहरापासून अवघ्या २-३ कि.मी. वर असणारा रत्‍नदुर्ग हा पर्यटकांसाठी मुख्य आकर्षणाचा विषय ठरला आहे तो त्यावरील अत्यंत सुंदर भगवती मंदिरामुळे, येथून दि्सणाऱ्या समुद्राच्या विहंगम दृश्यामुळे आणि समुद्रापर्यंत जाणार्या किल्ल्यातील भुयारी मार्गामुळे. रत्‍नदुर्ग रत्‍नागिरी शहराच्या अत्यंत जवळ असून अरबी समुद्राच्या काठावरील डोंगरावर बांधण्यात आला आहे. किल्ल्याचा आकार घोडाच्या नालासारखा असून क्षेत्रफळ १२० एकर आहे. रत्‍नदुर्ग तीनही बाजूंनी समुद्राने वेढलेला असून याच्या आग्रेय दिशेला जमीन आहे.
रत्नागिरी शहरात डॉ. बाबासाहेब सावंत कोकण विद्यापीठाच्या अधिपत्याखालील मत्स्य महाविद्यालयाचे सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र रत्नदुर्ग किल्ल्याजवळ आहे. येथे खाऱ्या व गोड्या पाण्यातील विविध प्रकारचे मासे व इतर जलचर यांचे संग्रहालय आहे. घोडमासा, कोंबडामासा, ट्रिगरमासा, समुद्री काकडी, शेवंड, तारामासा, ऑक्टोपस, समुद्री कासवे, समुद्री साप अशा अनेक नमुन्यांबरोबरच सुमारे १३०० समुद्री जिवांचे नमुने असलेले हे मत्स्यालय पर्यटकांबरोबरच अभ्यासकांचेही आकर्षण ठरले आहे. त्या शिवाय शिंपल्यांचे २५० हून जास्त प्रकार इथे ठेवले आहेत.
भारतीय असंतोषाचे जनक अशी बिरुदावली धारण करणारे स्वातंत्र्यसंग्रामाचे अध्वर्यू लोकमान्य टिळक यांचा दीडशे वर्षांपूर्वी १८५६ मधे रत्नागिरीत जन्म झाला. रत्नागिरी शहरातील मध्यवर्ती भागात टिळक आळीत हे टुमदार कोकणी घर असून जन्मानंतर लो. टिळकांचे या घरांत सुमारे १० वर्षे वास्तव्य होते.आहे.
जय विनायक मंदिर. हे रत्नागिरी जिल्ह्यातील नवीन बांधलेले मंदिर आहे. मंदिर स्वच्छ आणि सुंदर सजवलेल्या बागेसाठी आणि पर्यटकांसाठी ताजी हवा आणि थंड वातावरणासाठी ओळखले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Rate Today: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर! मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रात आजचा भाव किती? जाणून घ्या CNGचे दरही

अरुणा इराणी यांच्यावर दु:खाचा डोंगर; पती कुकू कोहली यांचं 77व्या वर्षी निधन

Kolhapur Konkan New Road: कोल्हापुरातून कोकणात जाण्यासाठी आणखी एक घाटमार्ग, घोटगे-सोनवडे मार्गासाठी केंद्राची मंजुरी; कुडाळ-कोल्हापूर अंतर होणार कमी

Latest Marathi News Live Update : फॉलोऑन टाळण्यासाठी श्रीलंकेला 38 धावांची गरज; सोनल दिनूषाच्या खेळीमुळे भारताची चिंता वाढली

Sugar Price Hike Maharashtra : साखरेचे भाव क्विंटलमागे 900 रुपयांनी घसरले; तरीही किरकोळ बाजारात दर 67 रुपयांवर, फायदा साठेबाजांचाच?

SCROLL FOR NEXT