आजच्या काळात प्रेमात पडणे आणि ब्रेकअप होणे ही खूप साधारण गोष्ट आहे पण, ब्रेकअपनंतर जो त्रास होत त्यातून कोणालाच सहज बाहेर पडता येत नाही. रिेलेशपशीपमध्ये कोणाचीही चूक असो, तुमची किंवा तुमच्या जोडीदाराची, दोघांना तितकाच त्रास होतो. जोडीदारासोबतच्या चांगल्या आठवणी आणि प्रेमात दिलेली वचन हे सर्वकाही विसरून जाणे कोणासाठीही अवघडच असते. पण कित्येकवेळा कपल्समध्ये होणारे छोटे मोठे वाद इतके वाढत जातात की भविष्याचा विचार करुन त्यांना वेगळं होण्याचा निर्णय घ्यावा लागतो.
ब्रेकअपनंतर जोडीदाराच्या आठवणी सतत आठवतात त्यापासून सुटका कशी मिळेल असा प्रश्न पडतो. जर तुम्हालाही प्रेमामध्ये अशा काळातून जावे लागत असेल आणि तुम्हालाही या प्रश्नाचे उत्तर हवे असेल तर या टीप्स फॉलो करा.- ब्रेकअपनंतर तुमच्या एक्सच्या आठवणींमधून सुटका मिळविण्यासाठी आपल्या कुटुंब आणि मित्र- मैत्रिणींसोबत जास्त वेळ घालविण्याचा प्रयत्न करा. कोणाला तरी विसरण्यासाठी दुसऱ्या कोणाचातरी आधार घ्यावा लागत असेल तर आजिबात मागे फिरू नका. मित्र- मैत्रिणींसोबत आपल्या ब्रेकबाबत शेअर करा आणि त्यांचा सल्ला घ्या कारण वाईट काळात आयुष्यात पुढे जाण्यासाठी आधार मिळेल. सोशल मीडियावर कमीत कमी वेळ घालवा जेणेकरुन तुमच्या एक्सला देखील सर्व सोशल मिडिया अकाऊंट्समधून काढून टाका.
आपल्या जुन्या आठवणी आणि गोष्टी विसरून आयुष्यात पु़ढे जावे लागते. स्वत:ला इतकं मजबूत बनवा की तुम्हाला कोणाची गरज पडणार नाही एक्सला विसरण्यासाठी दारुचा पर्याय निवडू नका. आपले मानसिक संतुलन जपण्यासाठी रोज 8 तास झोप घेण्याची आवश्यकता आहे आणि मेडिटेशन नक्की करा. मे़डिटेशनमुळे मनात सकारात्मक विचार येतात आणि तुम्हाला आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रेरणा मिळते. रोजाच्या आहारात हेल्दी डाएट समाविष्ट करा. डिप्रेशनमध्ये दूर करण्यासाठी रोज सकाळी कोवळ्या उन्हात थोडावेळ चालण्यासाठी घराबाहेर पडा.स्वत:वर प्रेम करायला शिका : रोज एक्सरसाईज आणि मेडिटेशन करा. त्यामुळे तुम्ही आनंदी राहाल, मन शांत राहील आणि तुमच्ये आरोग्यही चांगले राहीलRead latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.