Relationship Tips Esakal
फोटोग्राफी

Relationship Tips: नात्यात वाढलेला दुरावा कमी करायचाय? या खास टिप्स

जर एखाद्या व्यक्तीस व्यसन किंवा वाईट सवयी असल्यास त्या व्यक्तीमध्ये योग्य तो बदल तुम्ही करु शकता.

सकाळ डिजिटल टीम

एखादं नातं फुलायला बराच वेळ लागतो, पण नातं तुटायला एक क्षण पुरेसा होतो. लहान सहान गोष्टींमुळे नात्यात दुरावा येतो. 

अनेकदा नात्यात येणाऱ्या दुराव्यासाठी त्या दोन्ही व्यक्ती जवाबदार असतात, हे नाकारता येणार नाही. या जगात प्रत्येक माणसात काहीनाकाही गुण आणि दोष असतातच.
तुम्ही त्या व्यक्तीत काय शोधता किंवा त्या व्यक्तीचा कसा विचार करता हे महत्त्वाचे असते जर तुमच्या नात्यात दूरावा येत असेल तर त्याची कारणे काय असू शकतात हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
चुका माणसांकडूनच होतात हे लहानपणापासूनच आपल्याला सांगितलं जातं. तुम्ही वाद न घालता चुक मान्य केली तर समोरची व्यक्ती जास्त वेळ तुमच्यावर राग धरुन राहत नाही.
तुमचे पहिलं प्राधान्य हे तुमच्या नात्याला असावं. तुम्ही दोघांनीही एकमेकांना समान महत्त्व दिलं पाहिजे.
नात्याची जवाबदारी ही कुणा एकट्यावर न पडता दोघांनींही घेतली पाहिजे. चांगल्या आठवणी जमा करा, जेणेकरुन चांगलाच वेळ घालवण्याची सवय लागेल.
वाईट वेळ घालवणे किंवा वाईट आठवणींना उजाळा देऊन त्यावर भांडत बसणे यात शहाणपणा नाही. तुमच्या संवादाने, तुम्ही वापरणाऱ्या शब्दांनी कोणत्याही प्रकारचं शोषण होणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल.
तुमचा संवाद हा समोरच्याला अपमानकारक वाटेल असा नसावा. जर असा संवाद असल्यास तुमचे नाते फार काळ तग धरु शकत नाही.
बदल हा परिवर्तनाचा नियमच आहे. पण एखादी व्यक्ती जन्मत: तशीच असल्यास त्या व्यक्तीला पूर्णपणे बदलण्याचा प्रयत्न ना केलेला बरा.
जर एखाद्या व्यक्तीस व्यसन किंवा वाईट सवयी असल्यास त्या व्यक्तीमध्ये योग्य तो बदल तुम्ही करु शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Muhurat Trading 2025: मुहूर्त ट्रेडिंगला शेअर बाजारात स्थिर वाढ; सेन्सेक्स-निफ्टी सपाट, कोणते शेअर्स वाढले?

Quick Commerce: आता किराणासारख्याच इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तूही १० मिनिटांत घरी पोहोचणार, टाटा आणि अंबानी नवा अध्याय सुरू करणार

Recharge Offers : दिवसाला फक्त 5 रुपयांत वर्षभराचा रिचार्ज; अनलिमिटेड कॉल, रोज 2GB डेटा, SMS अन् बरंच काही..बड्या कंपनीने आणली ऑफर

Teacher Recruitment : डीएड-बीएडधारकांसाठी सुवर्णसंधी! राज्यात १८ हजार शिक्षकांची होणार भरती; 'या' तारखेला 'टीईटी' परीक्षा

Jayant Patil : जयंत पाटलांना घेरण्यासाठी महायुती एकवटली, इस्लामपूर नगरपालिका निवडणुकीत एकदिलाचा निर्धार

SCROLL FOR NEXT