Rishabh Pant ind vs sa First win as Team India 
फोटोग्राफी

IND vs SA: पंतच्या नेतृत्वाखाली भारत पहिल्यांदाच जिंकला; विजयाचे 5 हिरो

सलग दोन पराभव झालेल्या भारताने तिसऱ्या टी 20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 48 धावांनी पराभव करत विजयाचे खाते उघडले

Kiran Mahanavar

Rishabh Pant ind vs sa First win as Team India: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी 20 मालिकेतील तीन सामने पार पडले आहेत. सलग दोन पराभव झालेल्या भारताने तिसऱ्या टी 20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 48 धावांनी पराभव करत विजयाचे खाते उघडले आहे. भारतीय संघाने तिसऱ्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 48 धावांनी पराभव केला. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली भारत पहिल्यांदाच जिंकला आहे. टीम इंडियाच्या या विजयात हे 5 खेळाडू हिरो बनून आहे.

ऋतुराज गायकवाड - ईशान किशनसोबत पहिल्या विकेटसाठी 97 धावांची भागीदारी केली. गायकवाडने 35 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकार ठोकत आपले पहिले आंतरराष्ट्रीय अर्धशतक ठोकले.
ईशान किशन - किशनने या मालिकेतील दुसरे अर्धशतक झळकावले. पहिल्या T20 सामन्यातही त्याने अर्धशतक झळकावले होते. तिसऱ्या सामन्यात ईशानने 35 चेंडूंत पाच चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 54 धावांची खेळी केली.
हर्षल पटेल - हर्षल पटेलने मधल्या षटकांमध्ये लागोपाठ विकेट घेत आफ्रिकन फलंदाजांचे कंबरडे मोडले. हर्षलने अवघ्या 25 धावांत चार बळी घेतले.
युझवेंद्र चहल - गेल्या काही सामन्यांपासून फॉर्मात नसलेल्या युझवेंद्र चहलनेही या सामन्यात तीन विकेट घेत भारताला विजय मिळवून दिला. चहलने चार षटकांत २० धावा देत तीन बळी घेत फलंदाजांवर एकीकडून दडपण ठेवले.
हार्दिक पांड्या - शेवटच्या षटकात तुफानी खेळी खेळत पंड्याने अवघ्या 21 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 31 धावांची नाबाद खेळी केली. त्याची ही खेळी अखेरीस भारतासाठी महत्त्वाची ठरली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump Decision Impact: ट्रम्पचा डाव उलटणार? TCS, Infosys, Wiproसह भारतीय IT कंपन्यांना झटका देताना अमेरिकाच अडचणीत?

Ranji Trophy : रवींद्र जडेजाचे खणखणीत शतक, रिंकू सिंगनेही पार केला तिहेरी आकडा; दोघांची फटकेबाजी अन् प्रतिस्पर्धी गार...

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींचा ज्ञानेश कुमार यांना इशारा; म्हणाले, ‘तुमची झोप उडाली आहे, आम्ही तुम्हाला सोडणार नाही’

Indian Railway Recruitment: रेल्वेत सरकारी नोकरीची मोठी संधी! ३,५४८ जागा; कोण अर्ज करू शकतं जाणून घ्या

भाजप नेत्याची काठ्या-दगडांनी मारहाण करत हत्या, ५-६ जणांनी घेरलं अन्....; धक्कादायक VIDEO समोर

SCROLL FOR NEXT