'बालपणीचा काळ सुखाचा', असं म्हटलं जातं हे खरंय; पण जसजसं आपण मोठे होत जातो, तसतसं बालपण मागे पडत जातं आणि उरतात, त्या फक्त आठवणी!
'बालपणीचा काळ सुखाचा', असं म्हटलं जातं हे खरंय; पण जसजसं आपण मोठे होत जातो, तसतसं बालपण मागे पडत जातं आणि उरतात, त्या फक्त आठवणी! राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसेंना देखील असाच काहीसा प्रत्येय आला. त्यांनी फेसबुक पोस्ट शेअर करत बालपणीच्या आठवणींना उजाळा दिलाय.रोहिणी खडसे या एका कार्यक्रमानिमित्त सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी असलेल्या सावखेडा (ता. यावल) येथे गेल्या असता, वाटेत रस्त्याच्या कडेला शेताच्या बांधावर असलेल्या बोरीच्या झाडाकडं त्यांचं लक्ष गेलं. मग काय, बोरं बघून त्यांचे पाय आपसूकच 'अस्सल रानमेवा' असलेली बोरं वेचण्याकडं गेलं. यातून लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या, अशी त्यांनी फोटोसह पोस्ट शेअर केलीय.रोहिणी खडसे या मुक्ताईनगर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुढारी आहेत. त्या एकनाथ खडसे यांच्या कन्या देखील आहेत.'बोर' हे एक हंगामी फळ आहे, जो बर्याच लोकांना आवडतो. हे फळ खाण्यात खूप मऊ आणि गोड असतं. शिवाय, फिकट हिरव्या रंगाचं असतात. बोराला ‘चिनी खजूर’ असंही म्हणतात. चीनमध्ये याचा उपयोग औषधी बनविण्यासाठी होतो. हे फळ आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. त्यात बरेच पौष्टिक पदार्थ आढळतात. यासह, कॅल्शियम आणि फॉस्फरसचे पर्याप्त प्रमाणात आढळतं. हे फळ आपल्या देशातील बर्याच भागात वेगवेगळ्या नावानं ओळखलं जातं.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.