फोटोग्राफी

IPL 2022 RCB : ड्युप्लेसीस करेल का विराटचे स्वप्न पूर्ण...

सकाळ वृत्तसेवा

IPL 2022 : लवकरच आयपीएलचा 15 व्या हंगामाला सुरूवात होणार आहे. दरम्यान बंगळुरु संघाचे कर्णधार पद कोणाकडे सोपवणार याची चर्चा सर्वत्र सुरू होती. अखेर बंगळुरु संघाचे नेतृत्व कोण करणार हे चित्र स्पष्ट झाले आहे.

विराट कोहलीने आयपीएल हंगामाच्या आधीच टीम इंडियाच्या कॅप्टन्सीसोबतच फ्रँचायझी संघाचे नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतला होता. एबी डिव्हिलियर्सनेही क्रिकेट मधून निवृत्ती घेतली. त्यामुळे बंगळुरु संघाचे कर्णधार पद कोणाकडे जाणार याची चर्चा सुरू होती. बंगळुरु फ्रँचायझीने 12 मार्चला याबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती दिली होती. आता त्यांनी आपला नवा कर्णधार कोण हे स्पष्ट केले आहे.
बंगळुरु संघाचे कर्णधारपदी दक्षिण आफ्रिकेच्या फाफ डु प्लेसीससकडे सोपवले आहे. शनिवारी बंगळुरु फ्रँचायझीने अधिकृतरित्या याची घोषणा केली.
फाफ डु प्लेसीस हा गेल्या वर्षीपर्यंत चेन्नई संघाचा फलंदाज राहिलेला आहे. बंगळुरु संघाने फाफला या वर्षीच्या आयपीएल लिलावात 7 कोटीला संघात स्थान दिले होते. आणि आता त्याच्या खांद्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.
IPL मध्ये आजपर्यंत बंगळुरु संघाने एकदाही ट्रॉफी जिंकलेली नाही. या वेळी संघात मोठा बदल करण्यात आला आहे. एबी डिव्हिलियर्सही यावेळी संघाचा भाग नाही.
भारतीय संघाचा फलंदाज आणि यष्टीरक्षक दिनेश कार्तिक हा यंदा बंगळुरुच्या जर्सीत खेळताना दिसेल. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली मिळालेले अपयश बाजूला ठेवून फाफचा नवा संघ इतिहास घड़वणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDC drugs ban: मोठा निर्णय! केंद्राकडून १६ प्रकारच्या‘एफडीसी’ औषधांवर बंदी; 'या' मेडिसिन्सचा समावेश

Aditya Thackeray: ''गेलेल्यांना माघारी यायचं असेल तर...'' उद्धव ठाकरेंचा निरोप देत, आदित्यंचं मोठं विधान, काय म्हणाले?

Rohit Sharma चं टेन्शन वाढणार... कर्णधार शुभमन गिलने अफगणिस्तानविरुद्धच्या विजयानंतर दिलाय इशारा

Wani Dog Attack : वणी शहरात पिसाळलेल्या कुत्र्याचा कहर; दोन दिवसांत ३३ जण जखमी, नागरिक दहशतीत ग्रामपालिकेकडे तात्काळ कारवाईची मागणी

Vani News : मंडपाचा पाईप विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने मंडप व्यावसायीक तरुणाचा मृत्यू...

SCROLL FOR NEXT