junior NTR political background  sakal
फोटोग्राफी

PHOTO: 'ज्युनिअर एनटीआर'ची राजकीय पार्श्वभूमी माहित आहे का? पाहून झोप उडेल

'RRR' फेम 'ज्युनिअर एनटीआर'ला मोठा राजकीय वारसा लाभला आहे. आजही दाक्षिणात्य राजकारणात त्यांच्या कुटुंबाचा दबदबा आहे.

नीलेश अडसूळ

Junior NTR : अभिनेता नंदमुरी तारक रामा राव म्हणजेच 'ज्युनियर एनटीआर' (Jr NTR) चा आज आज ३९ वा वाढदिवस. 'स्टूडंट नं 1', 'राखी', 'सिम्हाद्री', 'टेंपर', 'प्रेमाथो', 'जनता गैराज' आणि 'बादशाह' यांसारखे हिट चित्रपट देणाऱ्या ज्युनियर एनटीआरने आपल्या अभिनयाने चाहत्यांना भुरळ घातली. विशेष म्हणजे नुकत्याच येऊन गेलेल्या आरआरआर (RRR) या चित्रपटानंतर एनटीआर जगभरात पोहोचला. ज्यनिअर एनटीआरला हा वारसा घरातूनच लाभला आहे. केवळ अभिनयाचा नाही तर राजकीय वासराही मिळाला आहे. ज्युनिअर एनटीआर ची राजकीय पार्श्वभूमी पाहून आपले डोळे फिरतील. (jr NTR BIRTHDAY) (jr NTR political background)

'एनटीआर' या नावालाच वारसा आहे. ज्युनिअर एनटीआरचं नाव हे त्याच्या आजोबांच्या म्हणजे 'एनटीआर' यांच्या नावावरून ठेवण्यात आलं आहे. 'नंदमुरी तारक रामा राव' म्हणजे 'एनटीआर'. त्याचे आजोबा हे प्रसिद्ध तेलुगू अभिनेते होते. अभिनय आणि निर्मितीतून नंतर ते राजकारणात आले. त्यांनी तेलुगू देसम पक्षाची स्थापना केली आणि त्याच्या सात वर्षांच्या कालावधीत ते आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्रीही झाले. ते तीन वेळा अखंड आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री राहिले आहेत.
'ज्युनिअर एनटीआर'चे वडील नंदमुरी हरिकृष्ण हेदेखील अभिनेते, निर्माते आणि राजकारणी आहे. ते राज्यसभेचे खासदारसुद्धा होते. तर काका नंदमुरी बालकृष्ण हे सुद्धा तेलुगू चित्रपटसृष्टी आणि राजकारणातलं मोठं नाव आहे.
आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे सुद्धा एनटीआरच्या आत्याचे पती.
घराण्याचा हा वारसा चालवणारा ज्युनिअर एनटीआर राजकारणात येईल का याचीही मोठी चर्चा आहे. तेलुगू देसम पक्षाच्या पडत्या काळात ज्युनिअर एनटीआरनं पक्षाची सूत्रं हाती घ्यावीत, अशीही मागणी त्याच्या फॅन्सकडून होत होती.
त्याच्या घराण्याचा एकूण इतिहास पाहता कला आणि राजकारण हातात हात घालून चालत आले आहे. त्यामुळे आता भूमिका स्पष्ट करत नसला तरी येत्या काही वर्षात ज्युनिअर एनटीआरही राजकारणात सक्रिय होईल असा अंदाज अनेकांनी वर्तवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अकरावी प्रवेशाची उद्या पहिली गुणवत्ता यादी! विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर येणार मेसेज; १२.५१ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी, प्रत्येक फेरीपूर्वी नावनोंदणीची संधी

Vaibhav Sooryavanshi ओपनर, सोबतीला कोण? IPL 2026 मधील अनकॅप्ड खेळाडूंची प्लेइंग इलेव्हन, तगड्या संघाला देईल टक्कर...

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातून वाहनधारकांसाठी दिलासादायक बातमी

Fishing Ban: मच्छीमारांसाठी महत्त्वाची बातमी! महाराष्ट्रात मासेमारी बंद राहणार; महायुती सरकारचा मोठा निर्णय

Loni Kalbhor Crime : बारावीच्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर अल्पवयीन मुलाकडून वारंवार अत्याचार; मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT