Dinesh Karthik wife Dipika Pallikal Sakal
दिनेश कार्तिकची पत्नी आणि भारताची स्क्वॅश खेळाडू दीपिका पल्लीकल कार्तिक हिने सुवर्ण कामगिरी केलीये. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने तिच्या या कामगिरीचं ट्विटच्या माध्यमातून कौतुक केलं आहे. पाहुयात दिपिकाच्या दमदार कमबॅकनंतरच्या यशाची कहाणी काही खास फोटोच्या माध्यमातून...
दिपिकानं आपला सहकारी सौरव घोषाल आणि जोशना चिनप्पा यांच्या साथीने वर्ल्ड चॅम्पियनशिप मिश्र दुहेरी आणि महिला दुहेरीत सुवर्ण पदकाची कमाई केलीये. सहा महिन्यापूर्वी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर ती कोर्टवर परतली आहे. यासाठी तिने चांगलीच मेहनत घेतलीये.स्क्वॅश खेळाडू सौरव घोषाल आणि दिपिका पल्लीकल या जोडीनं भारतासाठी सुवर्ण पदकाची कमाई केली.याआधी 2018 मध्ये दिपिका शेवटची कोर्टवर खेळताना दिसली. आई झाल्यानंतर फिटनेसवर कठोर मेहनत घेऊन तिने दैदिप्यमान यश मिळवले आहे.कोर्टवर उतरल्याची माहिती दिपिकाने आपल्या सोशल मीडियावरील अकाउंटवरुन शेअर केली होती.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.