sahkutumb sahparivar more family jejuri special episode photo sakal
फोटोग्राफी

Photo : सदानंदाचा येळकोट.. मोरे परिवाराने घेतले खंडेरायाचे दर्शन..

'सहकुटुंब सहपरिवार' या मालिकेतील मोरे परिवाराने जेजुरी गडावर जाऊन खंडेरायाची प्रार्थना केली. त्याचे हे खास फोटो..

नीलेश अडसूळ

star pravah : जेजुरीचा खंडोबा म्हणजे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. यळकोट यळकोट जय मल्हार असा जयघोष करत आणि भंडारा उधळत हजारो भाविक खंडोबाच्या दर्शनसाठी येतात. स्टार प्रवाहवरील सहकुटुंब सहपरिवार मालिकेतील संपूर्ण मोरे कुटुंब जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनाला गेले आहेत. खरतर गेल्या काही दिवसांपासून मोरे कुटुंब बऱ्याच अडचणींचा सामना करत आहे. नेहमी गुण्यागोविंदाने नांदणाऱ्या या कुटुंबाला जणू कुणाची दृष्ट लागली आणि आपापसातले गैरसमज वाढत गेले. कुटुंबावर ओढावलेलं हे अरिष्ट दूर व्हावं यासाठीच सर्वांनी मिळून जेजुरीला जायचं ठरवलं. १२ जूनच्या महाएपिसोडमध्ये सहकुटुंब सहपरिवारच्या कलाकारांसोबत प्रेक्षकांना खंडेरायाचा महादर्शन सोहळा अनुभवता येणार आहे. (sahkutumb sahparivar more family jejuri special episode photo)

सहकुटुंब सहपरिवार मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. याच प्रेमाचा साक्षात्कार जेजुरीच्या विशेष भागाच्या शूटिंगच्या निमित्ताने संपूर्ण टीमने घेतला.
गडाच्या पायऱ्या चढण्याचा विधीही या कुटुंबाने पूर्ण केला आहे. पश्याने अंजीला तर वैभवने अवनीला उचलून गडाच्या पायऱ्या चढल्या आहेत. हा सीन पूर्ण करताना सर्वांचीच तारेवरची कसरत झाली. मात्र जिद्दीने संपूर्ण टीमने हा सीन पूर्ण केला.
मोरे कुटुंबावर ओढावलेलं हे अरिष्ट दूर व्हावं यासाठीच सर्वांनी मिळून जेजुरीच्या खंडेरायाला जाऊन जागरण घालत प्रार्थना केली.
यावेळी यळकोट यळकोट जय मल्हार असा जयघोष करत संपूर्ण कुटुंबाने पारंपरिक पद्धतीने सर्व विधी पूर्ण करत खंडेरायाला साकडं घातलं आहे.
कुटुंब असावं तर मोरे कुटुंबासारखं, या मालिकेने आम्हाला सहकुटुंब सहपरिवाराचं महत्त्व पटवलं, जावा नाही तर मैत्रीणी म्हणून कसं रहावं हे सरु, अवनी आणि अंजीमुळे कळलं या आणि अश्या अनेक प्रतिक्रिया प्रेक्षकांनी मालिकेच्या संपूर्ण टीमला दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT