karan johar- salman khan file image
सलमान खान रिअॅलिटी शो साठी किती मानधन आकारतो, हे जाणून घेण्याची अनेकांना उत्सुक्ता आहे. चित्रपटांबरोबरच 'बिग बॉस' हा रिअॅलिटी शो ही सलमान खानची ओळख आहे. बिग बॉसच्या संपूर्ण सीझनसाठी सलमान खान तब्बल ३५० कोटी रुपये आकारतो अशी माहिती आहे. बिग बी म्हणजे अमिताभ बच्चन. चित्रपटांबरोबर 'कौन बनेगा करोडपती' हा प्रश्न-उत्तरांचा शो सुद्धा अमिताभ यांची ओळख आहे. 'कौन बनेगा करोडपती'च्या पहिल्या सीझनमध्ये प्रति एपिसोड अमिताभ तब्बल २५ लाख रुपये आकारायचे, असे वृत्त माध्यमांनी दिले आहे. कपिल शर्माचा शो ही नेहमीच चर्चेत असतो. आपल्या विनोदी शैलीने तो एकाचवेळी लाखो लोकांना हसवतो. भारतातच नाही, परदेशातही त्याच्या कार्यक्रमाचा चाहता वर्ग आहे. मागच्या सीझनमध्ये कपिल शर्मा प्रति एपिसोड ३० लाख रुपये आकारायचा. आता कपिलने आपली फी वाढवली असल्याचे वृत्त आहे. आता कपिल प्रतिएपिसोड ५० लाख रुपये आकारत असल्याची चर्चा आहे. निर्मात-दिग्दर्शक असलेल्या करण जोहरची यशस्वी सूत्रसंचालक अशीही ओळख आहे. 'झलक दिखला जा' सीझनमधून करणने तब्बल १० कोटी रुपयाची कमाई केल्याचे माध्यमांमध्ये चर्चा आहे. अभिनेता अक्षय कुमार चित्रपटांबरोबर काही शो चे सूत्रसंचालनही करतो. 'फिअर फॅक्टर खतरो के खिलाडी'चे सूत्रसंचालन अक्षय कुमारने केले होते. स्टंटवर आधारीत या शो च्या पहिल्या आणि तिसऱ्या सीझनचे संचालनक अक्षयने केले होते. सुरुवातीला अक्षयने प्रतिएपिसोड २.७५ कोटी ते ३ कोटी रुपये आकारल्याची माध्यमांची माहिती आहे. Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.