sangli
sangli 
फोटोग्राफी

PHOTO : सांगलीत मगरीने पाण्यातून बाहेर येत घेतला अखेरचा श्‍वास

शैलेश पेटकर

सांगली : कृष्णा-वारणा संगमावरील ब्रम्हनाळच्या डोहात तिचे राज्य होते. कुणी आपल्या क्षेत्रात येवू नये, यासाठी तिने दहशत निर्माण केली होती. इतर मगरींशी अनेकदा युद्ध ही केले होते. पण वय झालं. त्याला आपलं साम्राज्य सोडून अखेरचा प्रवास करावा लागला. राज्य असलेल्या डोहाच्या बाहेर येवून त्यानं अखेरचा श्‍वास घेतला. ब्रम्हनाळ (ता. पलूस) येथे १२ फुटी वयस्क मगरीचा मृतदेह आढळून आला.

कृष्णा नदीत मगरीचे साम्राज्य आहे. अनेक मगरींचे वास्तव्य याठिकाणी आहे. अनेकदा मगरींचे दर्शनही होत असते. पलूस तालुक्यातील ब्रम्हनाळ येथे शेतीकामासाठी काल सकाळी शेतकरी नदीकाळी गेले होते.
यावेळी त्यांना बारा फुटी महाकाय मगर त्यांना दिसून आली. घबरलेल्या शेतकऱ्यांनी उसकावण्याचा प्रयत्न केला परंतू हालचाल दिसून आली नाही. काही धाडसी तरूणांनी जवळ जावून पाहिले असते हालचाल दिसून आली नाही. यानंतर तत्काळ वनविभागास कळवण्यात आले.
वनक्षेत्रपाल युवराज पाटील, मानद वन्यजीवरक्षक अजितकुमार पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी मगर मृत असल्याचे समोर आले. त्यानंतर त्या मगरीस उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आले.
ही मगर १२ फुटी असून आहे. नर मगरीचे वय साधारणतः १५ वर्ष असावे. तीन-चार वर्षात अन्य मगरीशी भांडण झाल्याने उजवा बाजूचे पाऊल आणि जबडा जखमी झाला होता. वयोमानाने त्या मगरीचा मृत्यू झाल्याचे उत्तरीय तपासणीस पुढे आले आहे.
नदीच्या पाण्यातील मगरीचे साधारणतः वीस वर्षांचे आयुष्य असते. सांगली आणि परिसरात १८ फुटांपर्यंत मगरी आढळल्या आहे. ब्रम्हनाळ येथे मृतावस्थेत आढळेल्या मगरीचा वयोमानाने मृत्यू झाला असावा.
मगरींचा आता संगोपनाचा काळ सुरू आहे. त्यामुळे त्या आक्रमक भूमिकेत असतात. त्यामुळे नदीकाठच्या लोकांनी खबरदारी घ्यावी.
मगर दिसून आल्यास तातडीने वनविभागास कळवावे, असे आवाहन मानद वन्यजीव रक्षक अजितकुमार पाटील यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : ध्यानमुद्रेत बसले पीएम मोदी; पुढचे ४५ तास अन्नाचा कणही घेणार नाहीत

Bhagwan Pawar: पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुखांवर निलंबनाची कारवाई! काय घडलं नेमकं? जाणून घ्या

Heatstroke : बिहारमध्ये उष्माघाताने ३८ जणांचा मृत्यू तर मध्य प्रदेशात दोन चिमुकले दगावले

Pune Traffic News: गणेशखिंड रस्त्यावरील वाहतुकीत एक जूनपासून बदल, वाचा महत्वाची बातमी

Railway News: नागरिकांच्या प्रवासावर ब्लॉक नको; मेगा ब्लॉकवर मनसे आमदार राजू पाटील यांचे ट्विट

SCROLL FOR NEXT