आयेशा ओमर-शोएब मलिक आयेशा ओमर इन्स्टाग्राम
सध्या पाकिस्तानात आणि सोशल मीडियावर आयेशा ओमर (Ayesha Omar) आणि शोएब मलिकच्या (Shoaib Malik) हॉट फोटोशूटची चर्चा सुरु आहे.पाकिस्तानातील एका स्थानिक मॅगझिनसाठी आयेशा आणि ओमरने फोटोशूट केलं आहे. शोएब मलिक भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाचा पती आहे. गुरुवारी दुबईत झालेल्या टी २० वर्ल्डकपच्या उपांत्यफेरीच्या सामन्याला सानिया मिर्झा हजर होती.आयेशा आणि शोएबने मागच्या महिन्यात हे फोटोशूट केलं आहे. पण रविवारी पाकिस्तानी संघाने स्कॉटलंडवर विजय मिळवल्यानंतर तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर केले.त्यांचे हे फोटो समोर आल्यानंतर सोशल मीडियावर युझ्रर्सनी अनेक प्रश्न विचारले आहेत.तुम्ही दोघं लग्न करणार का? असा प्रश्न एका युझरने विचारला. त्यावर आयेशा ओमरने अजिबात नाही असे उत्तर दिले."शोएबच लग्न झालय आणि तो त्याच्या पत्नीसोबत आनंदी आहे. मी शोएब आणि सानिया दोघांचा आदर करते" असे आयेशा म्हणाली. शोएब आणि मी एकमेकाचे हितचिंतक आहोत. शोएब आणि मी परस्परांचे चांगले मित्र आहोत. या जगात लोकांचे असे संबंध असतात, असे तिने सांगितले. स्विमिंग पूलसह अन्य फोटोमधील दोघांचा लूक आणि जवळीक यामुळे या फोटोशूटची चर्चा सुरु आहे.आयेशा ओमर पाकिस्तानी अभिनेत्री (Pakistani actress) आहे. Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.