satej patil 
फोटोग्राफी

'जय भवानी, जय शिवाजी...'; सतेज पाटलांचा पन्हाळा-पावनखिंड मोहिमेत सहभाग

पन्हाळ्यावरील बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन मोहिमेला सुरुवात झाली.

सकाळ डिजिटल टीम

मागील अनेक वर्षांपासून कोल्हापुरातील बऱ्याच संस्था ऐतिहासिक पन्हाळा-पावनखिंड पदभ्रमंती या मोहिमेचे आयोजन करतात. या मोहिमेसाठी कोल्हापूरसह जिल्ह्यातील अनेक शिवभक्त हजेरी लावतात. यावेळी कोल्हापुरातील हिल रायडर्स अँड हायकर्स फाउंडेशनतर्फे यंदाही या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, यंदा कॉंग्रसेचे नेते सतेज पाटील हे या मोहिमेत सहभागी झालेले पहायला मिळाले. पन्हाळ्यावरील ऊर्जादायी वातावरणात बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन मोहिमेला सुरुवात झाली. याविषयी पाटील यांनी सोशल मीडियावर माहिती देत प्रवासाचे वर्णन केले आहे.

कोल्हापुरातील हिल रायडर्स अँड हायकर्स फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या एतिहासिक पन्हाळा-पावनखिंड पदभ्रमंती मोहिमेमध्ये कोल्हापूर कॉंग्रसेचे नेते सतेज पाटील सहभागी झाले.
दरम्यान, पन्हाळ्यावरील ऊर्जादायी वातावरणात बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन मोहिमेला सुरुवात झाली.
घनदाट धुके, थंडगार वारा व पावसाच्या सरी अशा निसर्गरम्य वातावरणात 'जय भवानी...जय शिवाजी...शिवाजी महाराज की जय, हर..हर..महादेव, नरवीर शिवाकाशीद व बाजीप्रभु देशपांडे की जय...या घोषणांनी संपुर्ण पन्हाळगड दणादणून गेला होता.
१२ आणि १३ जुलै १६६० या दिवशी पन्हाळगड ते विशाळगड या सह्याद्री पर्वत रांगेतील मार्गावर प्रचंड रणकंदन घडले. शिवछत्रपती व त्यांच्या रयतेच्या स्वतंत्र-सार्वभौम स्वराज्याच्या रक्षणार्थ अनेक मावळ्यांनी आपल्या प्राणांची आहूती दिली.
या जाज्वल्य पराक्रमी इतिहासाच्या स्मृती जपण्याच्या उद्देशाने विविध शिवभक्त - इतिहासप्रेमी संस्था-संघटनांच्यावतीने 'पन्हाळगड ते पावनखिंड' या साहसी पदभ्रमंती मोहिमेचे आयोजन केले जाते.
बोचरा वारा, प्रचंड पाऊस आणि सह्याद्री पर्वत रांगेतील काटेकुटे, चिखल, दगड-धोंड्यांनी माखलेल्या खडतर डोंगर-दऱ्यांच्या मार्गावरून ही पदभ्रमंती होते.
छ. शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापन करण्यासाठी केलेला संघर्ष तरुण पिढीला कळवा यासाठी अशा मोहिमांचे आयोजन करणे अत्यंत गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी सतेज पाटील यांनी दिली आहे.
महाराष्ट्राच्या सांस्कृतीक व सामाजिक इतिहासात आषाढी एकादशी निमीत्त पंढरपुराला जाणाऱ्या वारकऱ्यांची प्रदिर्घ परंपरा आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या लढवय्या इतिहासातही अशीच एक अलिखीत परंपरा म्हणून दरवर्षी या मोहिमेचे आयोजन केले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates : हिंसाचारात होरपळून निघालेल्या मणिपूरला पंतप्रधान मोदी आज देणार भेट

Mumbai : अभिनेत्रीनं धावत्या लोकलमधून मारली उडी, डोक्याला अन् पाठीला गंभीर दुखापत; रुग्णालयात उपचार सुरू

ENG vs SA 2nd T20 : इंग्लंडचा T20I मधील आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय मिळवला; नोंदवले एकापेक्षा सरस रेकॉर्ड

Nagpur News: रेल्वेच्या छतावर चढताच विजेचा धक्का; युवकाची प्रकृती चिंताजनक, रेल्वे स्थानकावरील घटना

मोठी बातमी! पगारावरील शिक्षकांनाही द्यावी लागणार ‘टीईटी’; सुप्रिम कोर्टाच्या निकालावर राज्य सरकार गप्पच; महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद घेणार २३ नोव्हेंबरला ‘टीईटी’

SCROLL FOR NEXT