फुललेले चेहरे, ऑफलाईन लेक्चर्स, मित्र-मैत्रिणी भेटल्याचा आनंद व गप्पांचा माहोल अशा वातावरणात शाळांची घंटा अखेर आज वाजली. ढोल व ड्रमच्या गजरात गुलाब देऊन विद्यार्थ्यांचे शाळांच्या प्रवेशद्वारावर जल्लोषी स्वागत करण्यात आले. शाळेच्या गजबजलेला परिसराचे वातावरण टिपलंय 'सकाळ'चे उल्हास देवळेकर यांनी...
फुललेले चेहरे, ऑफलाईन लेक्चर्स, मित्र-मैत्रिणी भेटल्याचा आनंद व गप्पांचा माहोल अशा वातावरणात शाळांची घंटा अखेर आज वाजली. शाळा सुरू झाल्याचा आनंद व कोरोनाच्या भीतीची अस्वस्थता पालक वर्गात अनुभवायला मिळाली. दीड वर्षानंतर शाळा सुरू झाल्याने शाळांचा परिसरही गजबजला.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने गतवर्षी लॉकडाऊन पुकारण्यात आला. शाळांचे दरवाजे आपोआपच बंद झाले. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. आज शहरातील आठवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले. सकाळी अकरा वाजता शाळा सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांची सकाळी दहापासून लगबग सुरू झाली.दफ्तरात वह्या, पुस्तके, कंपास साहित्य भरुन विद्यार्थ्यांनी शाळेचा रस्ता धरला. काही विद्यार्थी रिक्षातून शाळेत पोचले पालक वर्गही पाल्यांना सोडण्यासाठी आल्याचे चित्र पाहायला मिळाले. विद्यार्थ्यांना शिकविण्याचा ऑफलाईन आनंद घेण्यासाठी शिक्षक वर्गही आतुर होता. त्यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. विशेष म्हणजे बहुतांशी विद्यार्थ्यांसह पालक शाळांच्या परिसरात तोंडाला मास्क लावूनच आले होते. Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.