Facebook Founder House esakal
फोटोग्राफी

Facebook Founder House : सगळ्या जगाची झोप उडवणाऱ्या फेसबुकचा मालक राहातो कुठे?

आजपासून वीस वर्षांआधी 2003 मधे 'फेसमॅश' नावाने सुरू झालेले हे अॅप 2004 मध्ये आजच्या दिवशी 'फेसबुक' नावात बदलण्यात आले होते

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम

जगातील श्रीमंतांच्या यादीत असणारा मार्क झुकरबर्ग जगातील सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या फेसबुकचा मालक असल्याने त्याची चर्चा अशीही जगात असतेच. त्यामुळे तो एका दिवसात किती कमाई करतो ते त्याची पर्सनल लाइफ कशी आहे याबाबत जाणून घ्यायची सगळ्यांनाच उत्सुकता असते. आजपासून वीस वर्षांआधी 2003 मधे 'फेसमॅश' नावाने सुरू झालेले हे अॅप 2004 मध्ये आजच्या दिवशी 'फेसबुक' नावात बदलण्यात आले होते.

आज आपण फेसबुक मालकाचे आकर्षक घर आतून कसे दिसते ते जाणून घेणार आहोत. आजच्या तंत्रज्ञानात मोलाचा वाटा देणारा मार्क रोबोटिक घरात राहात असेल, त्याच्या घरातील सगळी उपकरणे टेक्नॉलॉजी बेस्ड असेल असे प्रत्येकालाच वाटते. मात्र रिअल आयुष्यात चौफेर झाडांनी वेडलेल्या आणि मोकळी हवा येणाऱ्या घरात तो राहातो. चला तर त्याच्या घराचे आतील लूक बघुया.
बर्‍याच अब्जाधीशांच्या घरांच्या अगदी वेगळे हे घर आहे. त्याने प्रिसिला चॅनशी लग्न करण्याच्या एक वर्ष आधी, मे 2011 मध्ये हे घर खरेदी केले होते. क्रिसेंट पार्क हाऊसमध्ये स्विमींग पूल, ग्लास इन सन रूम, पाच बेडरूम आणि पाच बाथरूम आहेत.
हे घर मेनलो पार्कमधील Facebook च्या ऑफिसजवळ आहे. तेथून त्याचे ऑफिस फक्त 10-मिनिटांच्या अंतरावर आहे. मार्क झुकेरबर्गच्या घरामध्ये मोठी जागा ही मोकळी ठेवण्यात आली आहे. कुठल्याही पार्टीसाठी ही जागा उत्तम आहे. एक मोठा हॉल, फायरप्लेस, बारबेक्यू झोन आणि एक स्पा रूमदेखील आहे. बाथरूममध्ये हिटर शॉवर आणि संगमरवरी दगडाने बनवलेला बाथ टब आहे. आतील भागात लाकडी फ्लोअरिंग आणि पारंपारिक फर्निचरचा समावेश आहे.
त्याच्या घरामागे लहान मानवनिर्मित धबधबा आणि पार्टीसाठी आकर्षक जागा आहे. येथे बार्बेक्यूसाठी सुद्धा वेगळी सोय आहे.तसेच या भागात आरामदायी फर्निचरसुद्धा आहे.
मार्कच्या राहत्या घराची किंमत 37 मीलीयन एवढी आहे. या घराचे फर्निचर अगदी रॉयल आहे.
त्याची नेटवर्थ 69.3 बिलीयनच्या घरात आहे. सर्व सोईसुविधांनी सज्ज असे त्याचे घर जगातील आलिशान घरांपैकी एक आहे.
त्याची मास्टर बेडरूमदेखील फार आलिशान आहे. त्याच्या घरातील बहुतांश फर्निचर हे लाकडी आहे.
त्याने तयार केलेल्या फेसबुक अॅपवर जगात 3 बिलीयनपेक्षा जास्त यूजर्स आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran War Ceasefire Talks : मोठी बातमी ! इराण युद्धबंदीच्या चर्चेसाठी तयार पण... डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितला नेमका अडथळा काय?

Viral Video: आधी आई-वडील गेले, मग पतीही गेला… माझ्या मुलाची काळजी घ्या... ; आईने व्हिडिओत रडत सांगितलं अन् संपवलं जीवन

Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! फेब्रुवारी अन् मार्चचा हप्ता एकाच वेळी मिळणार, तारीखही आली समोर...

Hadapsar Station: हडपसर स्थानकात चौथ्या फलाटाला मंजुरी; प्रवाशांची सोय, विस्तार झाल्याने रेल्वे गाड्यांची संख्या वाढणार

Heart & Kidney Disease Detection Tool: मधुमेहामुळे हार्ट आणि किडनीवर येणारा ताण आता आधीच ओळखता येणार; डॉक्टरांसाठी नवीन स्मार्ट टूल लाँच!

SCROLL FOR NEXT