पाहा मंगळवेढा तालुक्‍यातील पौराणिक आणि ऐतिहासिक स्थळांचा नजारा Canva
फोटोग्राफी

पाहा मंगळवेढा तालुक्‍यातील पौराणिक आणि ऐतिहासिक स्थळांचा नजारा !

पाहा मंगळवेढा तालुक्‍यातील पौराणिक आणि ऐतिहासिक स्थळांचा नजारा

दावल इनामदार

मंगळवेढा शहर व तालुका पवित्र संतांची भूमी असून सांगोला, मोहोळ, पंढरपूर व विजयपूर या तालुक्‍यांच्या तिठ्यावर वसलेला आहे.

ब्रह्मपुरी (सोलापूर) : मंगळवेढा (Mangalwedha, (Solapur) शहर व तालुका पवित्र संतांची भूमी असून सांगोला (Sangola), मोहोळ (Mohol), पंढरपूर (Pandharpur) व विजयपूर (Vijaypur) या तालुक्‍यांच्या तिठ्यावर वसलेला आहे. दुष्काळी तालुका म्हणून परिचित आहे पण त्याला पौराणिक (Mythological), ऐतिहासिक (Historical) आणि धार्मिक (Religious) अशा तिन्ही दृष्टिकोनातून मोठे महत्त्व आहे. संत दामाजीपंतांचे (Saint Damajipant) शहर असून ज्वारीचे कोठार (Sorghum) म्हणून प्रसिद्ध असताना तालुक्‍यातील तीर्थक्षेत्र असलेल्या माचणूर (Machnur) येथील कडेकपारीत निसर्गाच्या सान्निध्यात वसलेलं, धार्मिक असे हेमाडपंती श्री सिद्धेश्वर मंदिर (Siddheshwar Temple) असून, नदी पात्रात सुंदर देखणे असे श्री जटाशंकर मंदिर (Jatashankar Temple) आहे. माचणूर (ता. मंगळवेढा) येथील काही किलोमीटर अंतरावर तालुक्‍यातील अनेक आध्यात्मिक, ऐतिहासिक पर्यटन स्थळांची ख्याती असून, रमणीय ठिकाणे म्हणून भाविकांची व पर्यटकांची या ठिकाणी येण्याची ओढ असते.

माचणूर येथील हेमाडपंती श्री सिद्धेश्वर मंदिर
माचणूरपासून अर्धा किलोमीटर अंतरावर नदी पात्रापलीकडे असलेले बेगमपूर (ता. मोहोळ) येथील हाफिजा बेगमबी मासाहेब( रह.) यांचा दर्गाह.
माचणूर येथील मुघलकालीन औरंगजेब बादशहा यांचा भुईकोट किल्ला.
माचणूर येथील नदीपात्रातील श्री जटाशंकर मंदिर
माचणूर जवळच ब्रह्मपुरी (ता. मंगळवेढा) येथील नदी काठ स्थळावर राजमाता जिजाऊंच्या माहेरचा वारसा असलेले राजे जयजगदेवराव यांचे समाधीस्थळ.
माचणूरपासून 12 किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्गावर मंगळवेढा येथील श्री संत दामाजीपंत मंदिर.
माचणूरपासून 12 किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्गावर मंगळवेढा येथील हजरत पीरओ गैब मर्दान (रह.) यांचा दर्गाह.
माचणूरपासून 12 किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्गावरील मंगळवेढा येथील श्री संत चोखोमेळा मंदिर.
माचणूरपासून 12 किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्गावरील मंगळवेढा येथील श्री संत कान्होपात्रा मंदिर.
माचणूरपासून 12 किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्गावरील मंगळवेढा येथील हेमाडपंती श्री काशी विश्वेशर मंदिर.
माचणूरपासून 14 किलोमीटर अंतरावर भीमा नदी पात्रातील निसर्गाच्या सान्निध्यात बालगणेश म्हणून प्रसिद्ध असलेले सिद्धापूर येथील मातुर्लिंग मंदिर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : आजोबा भाजी विकायचे, वडील शिवणकाम करतात... लव्हप्रीतने भारतासाठी जिंकले ऐतिहासिक पदक!

Commonwealth Games 2026 : घोर निराशा... तजिंदरपाल सिंग तूर पदक जिंकण्यापासून वंचित, समरदीप सिंगलाही अपयश; नेमकं कुठे चुकले?

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Phule Wada Memorial Delay: फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम संथ; छगन भुजबळ यांची पुणे महापालिकेवर कडक टीका

Pune Police Misconduct: तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

SCROLL FOR NEXT