Uddhav Thackeray Shivsena Sakal
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आता शिवसेना आक्रमक झाली आहे. बैठकांचं सत्र सुरूच आहे. दरम्यान, या बंडखोरांनी आता आपल्या गटाचं नावही जाहीर केलं आहे. शिवसेना बाळासाहेब ठाकरे असं या गटाचं नाव होणार असल्याची माहिती बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी दिली आहे. यानंतर मात्र उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली. यामध्ये काही ठराव मंजूर करण्यात आले.यामध्ये बाळासाहेबांचं नाव ते बंडखोरांवर कारवाई अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली आणि ठराव मंजूर करण्यात आले. जाणून घ्या या ठरावांविषयीशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर कार्यकारणीचा पूर्ण विश्वास आहे.पक्षात निर्णय घेण्याचे सर्वाधिकार हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आहेत. शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे सर्व अधिकार राष्ट्रीय कार्यकारिणी पक्षप्रमुखांना देत आहे.बाळासाहेब ठाकरे व शिवसेना हे नाव कुणालाही वापरता येणार नाही.शिवसेना बाळासाहेब ठाकरे याची होती, आहे आणि कायम राहीलशिवसेनेची मराठी अस्मितेशी व हिंदुत्वाशी बांधिलकी कायम राहील.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.