Sakal
Sakal
फोटोग्राफी

International Museum Day : मुलांना पुण्यातील ही संग्रहालये दाखवाच!

सकाळ वृत्तसेवा

उन्हाळ्याची सुटी म्हटले की बच्चे कंपनीची धमाल असते. पण या सुटीचा चांगला उपयोग करून घ्यायचा असेल तर मनोरंजनाबरोबर ज्ञानार्जनही होईल, याचा विचार पालकांनी करायला हवा. यासाठी एक चांगला उपक्रम मुलांसाठी राबवायचा असेल तर तो म्हणजे पुण्यातील संग्रहालयांना भेटी. यातून मुलांचे मनोरंजन तर होईलच... शिवाय विविध विषयांचे ज्ञान आत्मसात करता येईल.

मुलांनो, चला तर मग पालकांबरेबर संग्रहालयांच्या भेटीला आणि सुटी सार्थकी लावा...

राष्ट्रीय युद्ध संग्रहालय - घोरपडी

वैशिष्ट्ये...

युद्धकाळात भारतीय सैन्याने वापरलेली रणगाडे, विमाने, रॉकेट, बंदुका आदींचा संग्रह

अगदी मराठा साम्राज्याच्या कालखंडापर्यंतच्या गोष्टींचा समावेश

युद्धात जप्त केलेले पाकिस्तानचे रणगाडे, श्रीलंकेतील लिट्टे विरुद्धच्या मोहिमेतील युद्धसाहित्य

शुल्क : आहे

वेळ : सकाळी ९ : ३० ते दुपारी १२ आणि दुपारी ४ ते संध्याकाळी ७ : ३०

सुटीचा दिवस : मंगळवार

राजा केळकर संग्रहालय - बाजीराव रस्ता शंभर वर्षांपूर्वीपासूनच्या अगदी फुंकणीपासून ते अत्तरदाणीपर्यंत रोजच्या वापरातील वस्तू विविध प्रकारचे दिवे, अडकित्ते, गंजिफा, सोंगट्या, शस्त्रे, पानदाने, पेटारे, दरवाजे, मूर्ती, कात्र्या, कळसूत्री बाहुल्या कोथरूड येथून मस्तानीचा महाल आणला आणि संग्रहालयात हुबेहूब तसा उभा केला आहे शुल्क : आहे वेळ : सकाळी १० ते सायंकाळी ५ : ३० वाजेपर्यंत सर्व दिवस खुले
कै. केशवराव जगताप अग्निशामक संग्रहालय - एरंडवणे भारतातील पहिले अग्निशामक संग्रहालय जवळपास १५ प्रकारच्या आपत्तीच्या वेळी मदतीसाठी लागणारे साहित्य शिवाय प्राथमिक स्तरांवर प्रशिक्षण देण्याचीदेखील सुविधा आहे शुल्क : नाही वेळ : सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत सर्व दिवस खुले
महात्मा फुले संग्रहालय - घोले रस्ता, शिवाजीनगर मुघल आणि मराठा शासकांची शस्त्रे हस्तशिल्प, खनिजे, विविध प्रकारचे प्राणी, पक्षी, कीटक साप आणि मासे यांचा टॅक्सीडर्मी संग्रह शुल्क : आहे वेळ : सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्व दिवस खुले
रेल्वे म्युझियम संग्रहालय - करिश्मा चौकजवळ, कर्वेनगर, कोथरूड रेल्वेच्या मूळ आकाराच्या ८७ पट लहान आकारचे इंजिन आणि डबे १८ फूट आकाराच्या बोर्डवर केवळ रेल्वे स्थानकच नाही तर संपूर्ण शहराची प्रतिकृती वसवली आहे वाफेवर धावणारे इंजिनपासून ते जगातली सर्वांत वेगवान समजली जाणारी आयसीई रेल्वेचेदेखील छोटे रूप इथे पाहण्यास उपलब्ध आहे शुल्क : आहे वेळ : सकाळी साडेनऊ ते दुपारी पाच सुटीचा दिवस : सर्व दिवस खुले (फक्त रविवारी सायंकाळी ५ ते रात्री ८)
विक्रम पेंडसे सायकल संग्रहालय - कर्वेनगर दीडशेपेक्षा अधिक दुर्मीळ सायकलींचा संग्रह शुल्क : आहे वेळ : सकाळी ११ ते सायंकाळी ७ पर्यंत फक्त शनिवारी आणि रविवारी खुले
लोकमान्य टिळक संग्रहालय - केसरी वाडा लोकमान्यांचा जीवनपट मांडणारे संग्रहालय त्यांच्या हस्ताक्षरातील पत्रे, गीचारहस्य, दुर्मीळ छायाचित्रे, अभ्यासिका मंडाले कारागृहाची प्रतिकृती शुल्क : नाही वेळ : सकाळी १० ते दुपारी १ आणि दुपारी ३ ते ६ सुटीचा दिवस : सर्व दिवस खुले (१५ ऑगस्ट, २६ जानेवारी, १ मे ला सुटी)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय - सेनापती बापट रस्ता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैयक्तिक संग्राहातील वस्तू कपडे, छायाचित्रे, अस्थिकलश गांधीजींना लिहिलेल्या पत्रांचा संग्रह शुल्क : आहे वेळ : सकाळी ९ : ३० ते सायंकाळी ५ : ३० सुटीचा दिवस : सर्व दिवस खुले
पेशवे संग्रहालय - पर्वती पेशवे राज्यकर्त्यांशी संबंधित शस्त्रे, कपडे, भांडी, दागिने, फर्निचर, वाद्ये आणि पालखी अशा सर्व गोष्टींचा समावेश आहे बाजीराव पेशवे, मस्तानी, नानासाहेब पेशवे, चिमाजीअप्पा पेशवे, बाळाजी विश्वनाथ यांची चित्रे. पेशव्यांशी संबंधित मध्ययुगीन हस्तलिखिते, तसेच पुणे शहराची काही जुनी आणि दुर्मीळ छायाचित्रेदेखील या संग्रहालयात आहेत. भारतात पेशवे, मुघल आणि ब्रिटिशांच्या काळात वापरल्या गेलेल्या असंख्य नाणी आणि चलनांचा संग्रह शुल्क : आहे वेळ : सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सर्व दिवस खुले
क्रिकेट संग्रहालय - सहकारनगर रोहन पाटे यांनी ब्लेड्स ऑफ ग्लोरी क्रिकेट म्युझियमची स्थापना केली. संग्रहालयात ५१ हजार हून अधिक क्रिकेटच्या वस्तू आहेत विश्वचषक विजेत्या संघाच्या कर्णधारांनी स्वाक्षरी केलेली बॅट; सर डोनाल्ड ब्रॅडमन, कपिल देव, महेंद्रसिंग धोनी, डेसमंड हेन्स, सर अॅलिस्टर कुक, सर व्हिव्ह रिचर्ड्स, रिकी पाँटिंग, इम्रान खान, सुनील गावसाकर, वसीम अक्रम, जॅक कॅलिस, सौरव गांगुली आणि विराट कोहली यांनी स्वाक्षरी केलेल्या आणि वापरलेल्या वैयक्तिक क्रिकेट वस्तू विश्वचषक विजेत्या संघाच्या प्रत्येक सदस्याने स्वाक्षरी केलेले बॅट शुल्क : आहे. वेळ : सकाळी १०. ३० ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सर्व दिवस खुले
आदिवासी सांस्कृतिक संग्रहालय - क्वीन्स गार्डन आदिवासी साहित्य संस्कृती, आदिवासी कलादालन, बोहाड्याचे मुखवटे बांबू कामाच्या वस्तू दालन, आदिवासी दागदागिने व देवदेवता मोकळ्या आवारातील आदिवासी झोपड्यांच्या प्रतिकृती, आदिवासी हस्तकलांची झलक शुल्क : आहे (ऑनलाईन बुकींग सुविधा) वेळ : सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत सर्व दिवस खुले
फरीद शेख कॅमेरा म्युझीयम - कोंढवा बुद्रुक शंभर वर्षांपासूनचा कॅमेरांचा प्रवास आजवरचे बहुतेक कॅमेरे पाहण्यासाठी उपलब्ध शुल्क : नाही वेळ : सकाळी १० ते दुपारी २ आणि दुपारी ४ ते संध्याकाळी ६ सर्व दिवस खुले
आर. के. लक्ष्मण आर्ट गॅलरी - बालेवाडी प्रसिद्ध व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांच्या बालपनापासून ते त्यांच्या शेवटच्या व्यंगचित्रापर्यंतचा प्रवास मांडणारे संग्रहालय. शुल्क : नाही वेळ : सकाळी ९ ते संध्याकाळी ५ सर्व दिवस खुले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT